IND vs SA 3rd Test; Virat, Umesh in Team India: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने तिसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विराटने या मालिकेत सलग दुसऱ्यांदा टॉस जिंकला. भारताच्या संघात या कसोटीसाठी दोन बदल करण्यात आले. दुखापतीतून सावरलेल्या विराटने पुन्हा एकदा कर्णधारपदाचा भार सांभाळला. त्याच्या जागी हनुमा विहारीला संघातून बाहेर करण्यात आले. तर दुसऱ्या कसोटीत दुखापतग्रस्त झालेल्या मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली असून त्याजागी वेगवान गोलंदाज उमेश यादवला संधी देण्यात आली.
--
भारताने आफ्रिकेत आतापर्यंत कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही. सध्या कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे ही कसोटी जिंकल्यास २-१ ने आफ्रिकेत पहिला कसोटी मालिका विजय साजरा करण्याची संधी विराटसेनेला आहे.
केपटाउनच्या मैदानावर गेल्या तीन वर्षात भारताने एकूण ५ कसोटी सामने खेळले आहेत. पण त्यातील एकही सामना भारताला जिंकता आलेला नाही. तीन सामन्यात भारत पराभूत झाला तर दोन सामने अनिर्णित राहिले. यंदा मात्र सामना जिंकून मालिकेत इतिहास रचण्याची मोठी संधी टीम इंडियाकडे आहे.