जोहान्सबर्ग: टीम इंडियाला (Team India) दक्षिण आफ्रिके (South Africa) विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 7 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. भारताने पहिला कसोटी सामना जिंकल्यामुळे तीन सामन्यांची मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसरा कसोटी सामना 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळला जाईल. दरम्यान, जोहान्सबर्गमध्ये टीम इंडियाच्या एका खेळाडूची खराब कामगिरी पराभनाचे कारण बनली. त्या खेळाडूला आता तिसऱ्या कसोटीत डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
तिसऱ्या कसोटीतून मिळणार डच्चू
दुसऱ्या कसोटीत विराट कोहलीच्या जागी टीम इंडियाचे नेतृत्व करणाऱ्या केएल राहुल (KL Rahul)ने संकेत दिले आहेत की, मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) तिसऱ्या कसोटीत बाहेर बसू शकतो. सामन्यात मोहम्मद सिराजकडून खूप आशा होत्या, मात्र दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने 6 षटके टाकून एकही विकेट घेतली नाही. पहिल्या डावातही त्याने 9.5 षटके टाकली, पण दुखापतीमुळे तो मैदानाबाहेर गेला. मीडियाशी बोलताना केएल राहुलने आमच्याकडे अधिक उपयुक्त गोलंदाज आहेत, असे सूचक विधान केले आहे. त्यावरुन अंदाज लावला जातोय की, सिराजला तिसऱ्या कसोटीत डच्चू मिळू शकतो.
विराट कोहलीबाबत मोठे अपडेट
केएल राहुलने मोहम्मद सिराजच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीबद्दल माहिती दिली. राहुल म्हणाला, 'सिराजला दुखापत झाली होती, पण सध्या त्याला बरं वाटत आहे. काही दिवसांची विश्रांती घेऊन तो परत मैदानावर येऊ शकतो. तसेच, राहुलने विराट कोहली (Virat Kohli) बद्दलही मोठे अपडेट दिले. तो म्हणाला, विराटला पूर्वीपेक्षा बरे वाटत आहे, गेल्या काही दिवसांपासून त्याने नेटमध्ये सराव सुरू केला आहे. तिसऱ्या कसोटीपर्यंत तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे.