मेलबर्न : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आज या स्पर्धेत भारत आणि झिम्बाब्वे आमनेसामने असणार आहेत. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात दिनेश कार्तिकच्या जागी रिषभ पंतला संधी मिळाली आहे. विश्वचषकात पंतने एकही सामना खेळला नाही त्यामुळे त्याला आजच्या सामन्यात संधी देण्यात आली आहे, असे भारतीय कर्णधार रोहित शर्माने म्हटले.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
भारतीय संघ ६ गुणांसह ग्रुप बी च्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. खरं तर भारताने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. मात्र क्रमवारीत अव्वल स्थानी कायम राहण्यासाठी आजचा सामना भारतीय संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. ग्रुप ए मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड या २ संघानी उपांत्य फेरी गाठली आहे. तर ग्रुप बी मधून कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान यांनी उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. त्यामुळे भारताने आजचा सामना जिंकला तर भारतीय संघ उपांत्य फेरीत इंग्लंडविरूद्ध खेळेल.
India vs Pakistan Final?ग्रुप १ मधून न्यूझीलंडने अव्वल स्थानासह, तर इंग्लंडने दुसऱ्या क्रमांकासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. ग्रुप २ मधून भारत व पाकिस्तान हे उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. पाकिस्तानने बांगलादेशला पराभूत करून दुसऱ्या स्थानासह सेमीत प्रवेश केला, तर भारत झिम्बाब्वेला नमवून टेबल टॉपर होत उपांत्य फेरीत जाईल. अशा परिस्थितीत भारत विरुद्ध इंग्लंड आणि पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड अशा उपांत्य फेरीच्या लढती अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला होतील. उपांत्य फेरीत भारत व पाकिस्तान यांनी बाजी मारली तर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल India vs Pakistan अशी होईल आणि त्याचीच क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा आहे.
उपांत्य फेरीतील सामनेन्यूझीलंड विरूद्ध बी ग्रुप मधील दुसऱ्या क्रमाकांचा संघ
इंग्लंड विरूद्ध बी ग्रुप मधील पहिल्या क्रमाकांचा संघ