हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेल्या 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला 6 बाद 208 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी -20 मालिकेत 1-2 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारताची सलग 10 ट्वेंटी-20 मालिकेतील अपराजित मालिका खंडित झाली. या सामन्यातील पराभवामुळे भारताला मालिका गमवावी लागली असली तरी कुलदीप यादवने कमाल केल्याचे पाहायला मिळत आहे.
या सामन्यात कुलदीपनेच भारताला पहिले यश मिळवून दिले. कुलदीपच्या गोलंदाजीवर महेंद्रसिंग धोनीने अप्रतिम यष्टीरक्षण केले. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन्ही ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये कुलदीपला संधी देण्यात आली नव्हती. पण तिसऱ्या सामन्यात मात्र कुलदीपने भेदक मारा केला आणि त्यामुळेच आयसीसी क्रमवारीत त्याला दुसरे स्थान पटकावता आले आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच कुलदीप आयसीसीच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयसीसीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा रशिद खान हा अव्वल क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा शादाब खान हा या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे.
भारताचा कुलदीप हाच एकमेव गोलंदाज अव्वल दहा गोलंदाजांमध्ये आहे. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या क्रमवारीत सहा स्थानांची घसरण झाली आहे. सध्याच्या घडीला चहल हा 17व्या स्थानावर आहे. भारताचा स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कमार हा अठराव्या स्थानावर आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्माला तीन स्थानांचा फायदा झाला आहे आणि लोकेश राहुलला तीन स्थानांचे नुकसान झाले आहे. रोहित सातव्या आणि राहुल दहाव्या स्थानावर आहे. भारताचा सलामावीर शिखर धवन हा अकराव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेत विराट कोहली खेळला नव्हता. यामुळे कोहलीचे क्रमवारीत चार स्थानांचे नुकसान झाले आहे, तो सध्या 19व्या स्थानावर आहे.
स्वत:ला धोनी समजायला गेला आणि दिनेश कार्तिक ट्रोल झाला
महेंद्रसिंग धोनी हा एक चांगला फिनीशर म्हणून ओळखला जातो. काही वेळा विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी धोनी एकेरी धाव घेत नाही. धोनीची अशी कॉपी करायला दिनेश कार्तिक गेला आणि सध्या सोशल मीडियावर तो ट्रोल होताना दिसत आहे.साऊथीच्या अखेरच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ही एक गोष्ट घडली, ज्यामुळे आता कार्तिक ट्रोल व्हायला लागला आहे. तिसऱ्या चेंडूवर कार्तिकने लाँग ऑनला एक फटका मारला. हा फटका मारल्यावर कृणाल पंड्या धाव घेण्यासाठी धावत गेला. पण कार्तिकने त्याला माघारी धाडले. यावेळी धोनीसारखा विचार कार्तिक करत असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर तीन चेंडूंमध्ये भारताला 14 धावांची गरज होती. कृणालही चांगली फटकेबाजी करत होता. त्यामुळे कृणालला जर एक धाव घेऊन फटकेबाजी करण्याची संधी कार्तिकने दिली असती तर कदाचित भारतीय संघ हा सामना जिंकूही शकला असता.
Web Title: India lost the series but Kuldeep Yadav did the best
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.