India tour of England: आईच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी इंग्लंड दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झाली प्रिया पुनिया; आठवला सचिन तेंडुलकर, विराट कोहलीचा त्याग!

India tour of England: भारतीय महिला संघातील सदस्य प्रिया पुनिया ( Priya Punia) हिच्या आईचे मंगळवारी कोरोना व्हायरसमुळे निधन झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 12:46 PM2021-05-19T12:46:05+5:302021-05-19T12:47:10+5:30

whatsapp join usJoin us
India tour of England: Day after losing mother to Covid-19, Priya Punia draws inspiration from Virat Kohli and joins Indian team in Mumbai | India tour of England: आईच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी इंग्लंड दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झाली प्रिया पुनिया; आठवला सचिन तेंडुलकर, विराट कोहलीचा त्याग!

India tour of England: आईच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी इंग्लंड दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झाली प्रिया पुनिया; आठवला सचिन तेंडुलकर, विराट कोहलीचा त्याग!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India tour of England: भारतीय महिला संघातील सदस्य प्रिया पुनिया ( Priya Punia) हिच्या आईचे मंगळवारी कोरोना व्हायरसमुळे निधन झाले. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यासाठी ती मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त नाही, असा अंदाज अनेकांनी लावला. पण, आईनंच तिला कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची शिकवण दिली होती आणि म्हणूनच दुसऱ्याच दिवशी ती इंग्लंड दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झाली अन् संघासाठी तयार केलेल्या बायो-बबलमध्ये आली. तिच्या या धाडसी निर्णयानं लोकांना पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर व विराट कोहली यांच्या त्यागाची आठवण करून दिली. Video : वीरेंद्र सेहवागनं सुरू केलीय 'माणुसकिची' बँक; गरजूंना देतोय मोफत ऑक्सिजन संच!

इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या कसोटी संघात तिची निवड केली गेली आहे. भारतीय महिला संघ या दौऱ्यावर एक कसोटी, तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. ऑक्सिजन पुरवठ्यात बाधा निर्माण झाल्यामुळे प्रियाच्या आईचे निधन झाले. SMS हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर ICUमध्ये उपचार सुरू होते. ''ती उपचारांना प्रतिसाद देत होती, परंतु ऑक्सिजन पुरवठ्यात बाधा झाल्यानं तिची ऑक्सिजनची पातळी घसरली आणि त्यानंतर तिला व्हेंटीलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले. पण, ती वाचू शकली नाही,'' असे प्रियाचे वडील सुरेंद्र यांनी सांगितले.   गेस्ट हाऊसवर कोरोना लस घेणं पडणार भारतीय खेळाडूला महागात; जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश 

आईच्या जाण्यानं प्रिया खूप दुःखी झाली. पण, मानसिक कणखरतेमुळे तिनं वडिलांसोबत चर्चा केली अन् राष्ट्रीय कर्तव्यावर जाण्याचा निर्णय घेतला. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि चेतन सकारीया यांनीही असाच मानसिक कणखरपणा दाखवला होता.   Most Beautiful Indian Women Cricketers : या अभिनेत्री नाहीत, तर आहेत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्टार खेळाडू!

प्रियाच्या आईनं १८ मे रोजी अखेरचा श्वास घेतला. तिनं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून दुःखाला वाट मोकळी केली. ''तू मला नेहमी का कणखर राहण्यास सांगायचीस, हे आता लक्षात येतंय. एक दिवस तुला गमावण्याचं दुःख मला सहन करावं लागेल, हे तुला माहीत होतं. आणि त्यासाठी तू मला कणखर  बनवलंस. पण मला तुझी आठवण येतेय आई. तू माझ्यापासून कितीही लांब असलीस, तरी तू नेहमी माझ्यासोबत आहेस. मला योग्य मार्ग दाखवणार. आयुष्यात सर्व प्रसंगांचा स्वीकार करणं अवघड आहे,''अशी पोस्ट तिनं लिहिली होती. 


महिला संघाच्या दौऱ्याचे वेळापत्रक - कसोटी ( 16 ते 19 जून, ब्रिस्टॉल), वन डे - ( 27, 30 जून व 3 जुलै), ट्वेंटी-20 - ( 9, 11 व 15 जुलै). WTC Final: न्यूझीलंडला कसोटी वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी इंग्लंडची मदत; भारतातील पराभवाचा असा घेणार बदला!

कसोटी व वन डे संघ - मिताली राज ( कर्णधार), स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, पूनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रीग्स, शेफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटिया ( यष्टिरक्षक), इंद्राणी रॉय ( यष्टिरक्षक), झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिस्त, राधा यादव.

ट्वेंटी-20 संघ - हरमनप्रीत कौर ( कर्णधार), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रीग्स, शेफाली वर्मा, रिचा घोष, हर्लीन देओल, स्नेह राणा, तानिया भाटीया, इंद्राणी रॉय, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिस्त, राधा यादव, सिमरन दिल बहादूर. 
 

Web Title: India tour of England: Day after losing mother to Covid-19, Priya Punia draws inspiration from Virat Kohli and joins Indian team in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.