India tour of New Zealand Full Schedule : भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघात बदलाचे वारे वाहण्याचे संकेत मिळत आहेत. नवा कर्णधार, नवा संघ अशी मोर्चेबांधणी सुरू झाली असून सीनियर्सना आता ट्वेंटी-२० खेळू नका असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी आता सुरू होणार आहे आणि त्यादृष्टीने BCCI ने आगामी दौऱ्यासाठी कर्णधारासह काही ताज्या दमाच्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. भारतीय संघ आता न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे आणि त्यात रोहित शर्मा, विराट कोहली आदी सीनियर्सना विश्रांती दिली गेली आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियातून थेट न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे आणि तेथे तीन ट्वेंटी-२० व तीन वेड सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी निवडलेल्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवले गेले आहे. रोहितनंतर आाता ट्वेंटी-२० संघाची जबाबदारी हार्दिककडेच सोपवण्याचा BCCI चा विचार आहे. त्यादिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. शुबमन गिल, इशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, उम्रान मलिक हे खेळाडू संघात परतले आहेत.
जाणून घ्या कधी होणार ही मालिका..
ट्वेंटी-२० मालिका
- १८ नोव्हेंबर - वेलिंग्टन, दुपारी १२ वाजल्यापासून
- २० नोव्हेंबर - माउंट मौनगानुई, दुपारी १२ वाजल्यापासून
- २२ नोव्हेंबर - नेपियर, दुपारी १२ वाजल्यापासून
वन डे मालिका
- २५ नोव्हेंबर - ऑकलंड, सकाळी ७.३० वाजल्यापासून
- २७ नोव्हेंबर - हॅमिल्टन, सकाळी ७.३० वाजल्यापासून
- ३० नोव्हेंबर - क्राइस्टचर्च, सकाळी ७.३० वाजल्यापासून
- भारताचा ट्वेंटी-२० संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), रिषभ पंत, शुबमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
- भारताचा वन डे संघ - शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"