ठळक मुद्दे13 जुलैपासून सुरू होणाऱ्या मालिकेत 3 वन डे व 3 ट्वेंटी-20 सामने खेळले जाणारचेतन साकरिया, कृष्णप्पा गौथम आदी युवा खेळाडूंना मिळाली संधी
India Tour to Sri Lanka : जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी गुरुवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ चार महिन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाची दुसरी फळी मैदानावर उतरवण्याची तयारी बीसीसीआयनं केली होती. त्यामुळे कर्णधारपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची सर्वांना उत्सुकता होती. शिखर धवन ( Shikhar Dhawan ) याच्यासह भुवनेश्वर कुमार व श्रेयस अय्यर यांचे नाव शर्यतीत होते, परंतु गब्बरकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 13 जुलै पासून सुरू होणाऱ्या मालिकेत टीम इंडियाचे कर्णधारपद शिखर धवनकडे असणार आहे. ( Shikhar Dhawan has been named captain for India's tour of Sri Lanka). भुवनेश्वरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयनं स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली आहे.
कर्नाटकचा सलामीवीर देवदत्त पडीक्कल ( Karnataka opener Devdutt Padikkal), महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड यांना संधी देण्यात आली आहे. विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक 827 धावा करणाऱ्या पृथ्वी शॉचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. भारत-इंग्लंड मालिकेत खेळणारे राहुल चहर, इशान किशन, सूर्यकुमार यादव यांनाही श्रीलंका दौऱ्यासाठी संघात स्थान मिळाले आहेत. वरुण चक्रवर्थी, नवदीप सैनी आणि दीपक चहर यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर नितीश राणा याला संधी देण्यात आली आहे, तर मनिष पांडे हा आणखी एक अनुभवी फलंदाज संघात परतला आहे. राजस्थान रॉयल्सकडून दमदार कामगिरी करणाऱ्या चेतन सकारियाची लॉटरी लागली आहे. कृष्णप्पा गौथम याचीही निवड केली गेली आहे.
भारतीय संघ - शिखर धवन ( कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), युझवेंद्र चहल, राहुल चहर, के गौथम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्थी, भुवनेश्वर कुमार ( उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारीया. ( India's squad: Shikhar Dhawan (Captain), Prithvi Shaw, Devdutt Padikkal, Ruturaj Gaikwad, Suryakumar Yadav, Manish Pandey, Hardik Pandya, Nitish Rana, Ishan Kishan (Wicket-keeper), Sanju Samson (Wicket-keeper), Yuzvendra Chahal, Rahul Chahar, K Gowtham, Krunal Pandya, Kuldeep Yadav, Varun Chakravarthy, Bhuvneshwar Kumar (Vice-captain), Deepak Chahar, Navdeep Saini, Chetan Sakariya)
नेट बॉलर्स - इशान पोरेल, संदीप वॉरियर्स, अर्षदीप सिंग, साई किशोर, सिमरजीत सिंग ( Net Bowlers: Ishan Porel, Sandeep Warrier, Arshdeep Singh, Sai Kishore, Simarjeet Singh)
स्पर्धेचे वेळापत्रक
वन डे मालिका - 13, 16 व 18 जुलै, कोलंबो
ट्वेंटी-20 मालिका - 21, 23 व 25 जुलै, कोलंबो
Web Title: India Tour to Sri Lanka : Shikhar Dhawan named captain for Sri Lanka tour; know Indian squad and full scheduled
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.