India vs Australia 1st ODI : पहिल्याच सामन्यात 'विराट' विकेट घेणारा रिचर्डसन आहे कोण?

India vs Australia 1st ODI: ऑस्ट्रेलियाच्या 288 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 01:11 PM2019-01-12T13:11:39+5:302019-01-12T13:40:06+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia 1st ODI: Know about Jhye Richardson, who took virat kohli wicket | India vs Australia 1st ODI : पहिल्याच सामन्यात 'विराट' विकेट घेणारा रिचर्डसन आहे कोण?

India vs Australia 1st ODI : पहिल्याच सामन्यात 'विराट' विकेट घेणारा रिचर्डसन आहे कोण?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारताचे तीन फलंदाज अवघ्या 4 धावांवर माघारीऑस्ट्रेलियाच्या 5 बाद 288 धावाशिखर धवन, अंबाती रायुडू शून्यावर बाद

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाच्या 288 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच षटकात सलामीवीर शिखर धवन शून्यावर बाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीकडून बऱ्याच अपेक्षा होत्या, परंतु 22 वर्षीय झाय रिचर्डसनने अत्यंत चतुराईने त्याला बाद केले. या विकेटनंतर रिचर्डसन याच्या चेहऱ्यावरील आनंद प्रचंड बोलका होता. भारताविरुद्ध पहिलाच सामना खेळणाऱ्या रिचर्डसनने त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर अंबाती रायुडूला बाद केले. त्यामुळे भारताची अवस्था 3 बाद 4 धावा अशी  दयनीय झाली होती. भारताला धक्के देणारा हा रिचर्डसन आहे तरी कोण?

उस्मान ख्वाजा, शॉन मार्श आणि पीटर हँड्सकोम्ब यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन डे भारतासमोर 289 धावांचे आव्हान ठेवले आहे. मार्कस स्टोइनिसने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना ऑस्ट्रेलियाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. भुवनेश्वर कुमार व कुलदीप यादव यांना प्रत्येकी दोन बळी. ऑस्ट्रेलियाने 5 बाद 288 धावा केल्या. त्यानंतर भारताची त्रेधातिरपीट झाली. 



वेस्टर्न ऑस्ट्रेलियात क्लबकडून 2015-16 मध्ये वयाच्या 19व्या वर्षी रिचर्डसनने पदार्पण केले. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्याने शेफिल्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेतही पदार्पण केले. अवघ्या एका प्रथम श्रेणी क्रिकेटचा अनुभव गाठीशी असणाऱ्या रिचर्डसनला 2017मध्ये राष्ट्रीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 संघात त्याने स्थान पटकावले. या अनुभवाच्या जोरावर त्याने बीग बॅश लीगमध्ये आपली छाप सोडली. त्याने 11 विकेट घेतल्या आणि विशेष म्हणजे पर्श स्कॉचर्स संघाला जेतेपदही जिंकून दिले. अंतिम लढतीत त्याने सिडनी सिक्सर्सच्या मधल्या फळीला धक्के देत 30 धावांत 3 महत्त्वाचे बळी टिले. 

ऑस्ट्रेलियाकडून चार वन डे सामन्यात त्याने 7 विकेट घेतल्या आहेत. 3 बाद 92 ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. ट्वेंटी-20 त्याने 9 सामन्यांत 7 बळी टिपले आहेत. 

Web Title: India vs Australia 1st ODI: Know about Jhye Richardson, who took virat kohli wicket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.