मुंबई : भारताला पहिल्याच एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने जोरदार धक्का दिला. वानखेडेवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनीच भारताच्य गोलंदाजांना धूळ चारत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. भारताचे २५६ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने एकही फलंदाज न गमावता सहजपणे पूर्ण केले.
08:28 PM
ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहज विजय
08:13 PM
कर्णधार आरोन फिंचचे दमदार शतक
07:56 PM
डेव्हिड वॉर्नरचे धडाकेबाज शतक
07:28 PM
ऑस्ट्रेलियाचे दीडशतक पूर्ण
06:49 PM
षटकारासह ऑस्ट्रेलियाचे शतक पूर्ण...
05:13 PM
शार्दुल ठाकूर आऊट
04:55 PM
शार्दुल ठाकूर आऊट
04:41 PM
रवींद्र जडेजा आऊट
03:50 PM
अॅश्टन अॅगरनं 28व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुलला बाद केले. राहुलनं 61 चेंडूंत 47 धावा केल्या. त्यानंतर पुढच्याच षटकात पॅट कमिन्सने टीम इंडियाला तिसरा धक्का दिला. शिखर 91 चेंडूंत 74 धावा करून माघारी परतला. 32व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विराट कोहलीनं खणखणीत षटकार मारला, परंतु अॅडम झम्पानं पुढच्याच चेंडूवर त्याला झेलबाद करून माघारी पाठवले. विराट 16 धावा करून तंबूत परतला.
03:38 PM
अॅश्टन अॅगरनं 28व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुलला बाद केले. राहुलनं 61 चेंडूंत 47 धावा केल्या. त्यानंतर पुढच्याच षटकात पॅट कमिन्सने टीम इंडियाला तिसरा धक्का दिला. शिखर 91 चेंडूंत 74 धावा करून माघारी परतला.
03:30 PM
अॅश्टन अॅगरनं 28व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुलला बाद केले. राहुलनं 61 चेंडूंत 47 धावा केल्या.
03:03 PM
धवन आणि लोकेश राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांच्या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियानं 15 षटकांत 1 बाद 72 धावा केल्या. धवननं 66 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. वन डे कारकीर्दितील त्याचे हे 28 वे अर्धशतक ठरले.
03:00 PM
02:43 PM
धवन आणि लोकेश राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांच्या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियानं 15 षटकांत 1 बाद 72 धावा केल्या.
02:20 PM
रोहित बाद झाल्यानंतर शिखर धवननं सामन्याची सूत्र हाती घेतली. त्यानं लोकेश राहुलसह सावध खेळ करताना संघाला 10 षटकांत 1 बाद 45 धावांपर्यंत मजल मारून दिली.
02:15 PM
रोहित शर्मा कसा बाद झाला
01:54 PM
मिचेल स्टार्कनं भारताला पहिला धक्का दिला. त्यानं रोहित शर्माला पाचव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. रोहित 15 चेंडूंत 2 चौकार लगावून 10 धावांवर बाद झाला.
01:17 PM
01:11 PM
01:10 PM
01:08 PM
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पदार्पण करणाऱ्या पहिल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूचा मान मार्नस लाबुशेननं पटकावला. आतापर्यंत सहा खेळाडूंनी वानखेडेवर पदार्पण केले, त्यापैकी वरूण आरोन हा एकमेव भारतीय खेळाडू आहे.
01:08 PM
ऑस्ट्रेलियाचा संघ
ऑस्ट्रेलिया - डेव्हिड वॉर्नर, आरोन फिंच, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशेन, अॅश्टन टर्नर, अॅलेक्स करी, अॅश्टन अॅगर, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, केन रिचर्डसन, अॅडम झम्पा
01:07 PM
विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार
भारताचा संघ - विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव
Web Title: India Vs Australia, 1st ODI Live Score: Updates, IND Vs AUS Highlights and Commentary in Marathi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.