सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाच्या धावगतीवर लगाम लावली आहे. उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आणि संघाला 150 धावांपर्यंत मजल मारून दिली. तरीही भारताने सामन्यावर वर्चस्व गाजवले होते. ड्रिन्स ब्रेक पर्यंत ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज माघारी पाठवून भारताने सामन्यावर पकड घेतली होती. त्यामुळे कर्णधार विराट कोहली चांगलाच आनंदात होता आणि ड्रिंक्स ब्रेकमध्ये त्यानं असं काही केलं की चाहते आणखी खूश झाले.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, तिसऱ्याच षटकात कर्णधार अॅरोन फिंच त्रिफळाचीत झाला. भुवनेश्वर कुमारने त्याला बाद करून वन डे तील विकेटचे शतक साजरे केले. त्यानंतर कुलदीप यादवने अॅलेक्स करीला स्लीपमध्ये रोहित शर्माकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. 2 बाद 41 अशा अवस्थेत सापडलेल्या ऑसींना मार्श व ख्वाजा यांनी सुस्थितीत आणले. ड्रिंक्स ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 76 धावा झाल्या होत्या.