मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताच्या गोलंदाजांना पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी धू धू धुतल्याचे पाहायला मिळाले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया सलामीवीरांनी भारताच्या गोलंदाजीची हवा काढून टाकल्याचे पाहायला मिळाले.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात भारताच्या फलंदाजांकडून हाराकिरी पाहायला मिळाली. सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी रचत भारताच्या धावसंख्येचा चांगला पाया रचला होता. पण या दोघांनंतर एकाही फलंदाजाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही आणि त्यामुळेच भारताला प्रथम फलंदाजी करताना २५५ धावांवर समाधान मानावे लागले.
भारताच्या २५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच हे दोघे मैदानात उतरले. मैदानात उतरून या दोघांनी भारताच्या गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडल्याचे पाहायला मिळाले. या दोघांनी दीडशतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा भक्कम पाया रचला.