Join us  

IND vs AUS : कोणासमोरही स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही, विराट कोहली

India vs Australia : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मायदेशासह परदेशातही खोऱ्याने धावा केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 5:34 PM

Open in App
ठळक मुद्देपहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ अॅडलेड येथे दाखल6 डिसेंबरपासून होणार पहिल्या सामन्याला सुरुवातशंभर टक्के योगदान देण्याचा कोहलीचा निर्धार

अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाः भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मायदेशासह परदेशातही खोऱ्याने धावा केल्या. भारतीय फलंदाज परदेशातही धावांचा पाऊस पाडू शकतो असा आत्मविश्वास त्याने अन्य सहकाऱ्यांमध्ये निर्माण केला आहे. त्याच आत्मविश्वासाने भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना 6 डिसेंबरपासून अॅडलेड येथे खेळवण्यात येणार आहे. याही कसोटी मालिकेत कोहलीकडून फार अपेक्षा आहेत. मात्र, कोणासमोरही स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसल्याने कोहलीला वाटते. मैदानावर शंभर टक्के योगदान देण्यासाठी सज्ज असल्याचे त्याने सांगितले. 

''प्रत्येक मालिकेतून तुम्हाला शिकावं लागतं. प्रत्येक दौरा आणि सामना हा आपली कसोटी पाहणारा असतो. ऑस्ट्रेलियाच्या मागील दौऱ्यात मी चोख कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे मला या दौऱ्यात कोणासमोर स्वतःला सिद्ध करण्याची काहीच गरज नाही,''असे मत कोहलीने सिडनीतील एका रेडिओ चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. तो पुढे म्हणाला,''माझ्याकडून संघाला काय अपेक्षित आहे, ते माझे लक्ष्य आहे. मी मैदानावर शंभर टक्के योगदान देण्यासाठी सज्ज आहे. हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे या मालिकेतही माझा तोच प्रयत्न असेल.'' 

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अॅडलेड येथे दाखल झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी 6 ते 10 डिसेंबर या कालावधीत अॅडलेड ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. ट्वेंटी-20 मालिकेतील बरोबरीनंतर भारतीय संघ सराव सामन्यासाठी सिडनीतच मुक्कामाला होता.  दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धच्या सराव सामना भारताने अनिर्णीत राखला. अरच्या दिवशी मुरली विजयने 129 धावांची खेळी केली. लोकेश राहुलनेही 62 धावा करताना सूर सापडल्याचा दिलासा दिला. भारताने हा सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 211 धावा करून सामना अनिर्णीत सोडवला. विजयने 132 चेंडूंत 129 धावा केल्या. त्यात 16 चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. पहिल्या डावात अवघ्या तीन धावांवर माघारी परतलेला लोकेश राहुलला दुसऱ्या डावात अर्धशतक करण्यात यशस्वी झाला. त्याने 98 चेंडूंत 62 धावा केल्या. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 544 धावांचा डोंगर उभा केला आणि 186 धावांची आघाडी घेतली. भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 211 धावा करून सामना अनिर्णीत सोडवला.  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहली