सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 34 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताला मालिकेत आव्हान कायम राखण्यासाठी पुढील सामना जिंकावा लागणार आहे. त्यात भर म्हणून भारताचा फलंदाज अंबाती रायुडूवर संकट ओढावले आहे. सिडनीत गोलंदाजी करणे त्याला महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सिडनीत झालेल्या वन डे सामन्यात रायुडूने दोन षटकं टाकली. त्याची गोलंदाजीची शैली अवैध असल्याचे निष्पन्न झाले आहे. सामनाधिकाऱ्यांनी याबाबत भारतीय संघ व्यवस्थापकांना सूचना केली आहे. त्यामुळे आयसीसीच्या नियमानुसार त्याच्या गोलंदाजीच्या शैलीचे निरिक्षण होणार आहे.
त्याला पुढील 14 दिवसांच्या आत चाचणीला सामोरे जावं लागणार आहे. या कालावधीत त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. चाचणीचा निकाल आल्यानंतर पुढील निर्णय होईल.
Web Title: India vs Australia ODI: India's Ambati Rayudu to undergo testing after being reported for a suspect bowling action at the SCG
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.