अॅडलेड पिंक बॉल टेस्ट आधी भारतीय संघ कॅनबेराच्या मैदानात ऑस्ट्रेलिया प्राइम मिनिस्टर इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय सराव सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर या दोन दिवसात होणाऱ्या सामन्याला शनिवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी सुरुवात होणार होती. पण पावसाच्या व्यत्ययामुळे कॅनबेराच्या मनुका मैदानात रंगणाऱ्या सामन्याचा टॉस नियोजित वेळेत होऊ शकला नाही. पहिल्या सेशनमधील खेळ वाया गेल्याचे पाहायला मिळाले.
प्रॅक्टिस मॅचचा आनंद घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी स्टेडियमवर लावलीये हजेरी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियन प्राइम मिनिस्टर इलेव्हन यांच्यातील सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीजही मैदानात उपस्थितीत आहेत. त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून दोन्ही संघातील खेळाडूंसोबतचे खास क्षणाचे फोटो शेअर केल्याचे दिसते.
पहिल्या सत्राचा खेळ पाण्यात, दुसऱ्या अन् तिसऱ्या सत्रातील खेळ तरी होणार का?
पहिले सत्र- सकाळी ९:१० ते ११:१० (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
दुसरे सत्र - दुपारी ११:५० ते १:५० (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
तिसरे सत्र- दुपारी २:१० ते ४:१० (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
ऑस्ट्रेलिया प्राइम मिनिस्टर इलेव्हन:
जॅक एडवर्ड्स (क), मॅट रेनशॉ, जॅक क्लेटन, ऑलिव्हर डेव्हिस, जेडेन गुडविन, सॅम हार्पर (डब्ल्यू), चार्ली अँडरसन, सॅम कोन्स्टास, स्कॉट बोलँड, लॉयड पोप, हॅनो जेकब्स, महाली बियर्डमन, एडन ओ' कॉनर, जेम रायन.
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, प्रसीद कृष्णा, मोहम्मद सिराज , आकाश दीप, हर्षित राणा, सरफराज खान, अभिमन्यू इसवरन, देवदत्त पडिक्कल
Web Title: India vs Australia PM XI Warm UP Match Live Score Rain in Canberra delays toss
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.