India vs Australia : भारताला पुन्हा धक्का; तिसऱ्या सामन्याबाबत धवनच्या खेळण्याबाबत संभ्रम

धवन या सामन्यात खेळला नाही तर भारतासाठी तो एक मोठा धक्का असू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 06:04 PM2020-01-18T18:04:26+5:302020-01-18T18:11:25+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia: Shikhar Dhawan's skepticism about the third match | India vs Australia : भारताला पुन्हा धक्का; तिसऱ्या सामन्याबाबत धवनच्या खेळण्याबाबत संभ्रम

India vs Australia : भारताला पुन्हा धक्का; तिसऱ्या सामन्याबाबत धवनच्या खेळण्याबाबत संभ्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

राजकोट, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा सलामीवीर शिखर धवन हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दाखापतग्रस्त झाला होता. त्यामुळेच तो क्षेत्ररक्षणाला येऊ शकला नव्हता. आता तर तिसऱ्या सामन्यात तो खेळणार की नाही, याबाबत संदिग्घता आहे. त्यामुळे धवन या सामन्यात खेळला नाही तर भारतासाठी तो एक मोठा धक्का असू शकतो.

धवन सध्या चांगल्या फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात धवनने दमदार फलंदाजी केली होती. दुसऱ्या सामन्यात तर धवनने भारताकडून सर्वाधिक ९६ धावांची खेळी साकारली होती. त्यामुळे धवन जर तिसऱ्या सामन्यात खेळला नाही तर तो भारतासाठी मोठा धक्का बसू शकतो.

Related image

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनने सर्वाधिक ९६ धावा केल्या होत्या. त्याचे शतक फक्त चार धावांनी हुकले होते. या सामन्यात पॅट कमिन्सचा एक चेंडू धवनवर आदळला होता. चेंडू आदळल्यावर धवन थेट मैदानात कोसळला होता. ही दुखापत गंभीर असल्यामुळे तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता.

Image result for shikhar dhawan and rohit sharma injury against australia

कमिन्सचा चेंडू धवनच्या पोटावर आदळला आणि तो थेट जमिनीवर पडला होता. त्यानंतर संघाच्या डॉक्टरांनी त्वरीत मैदानात धाव घेतली होती. कमिन्सचा हा चेंडू धवनच्या डाव्या बाजूच्या बरगड्यांवर लागला होता. त्यामुळे आता बरगड्यांना किती मार लागला आहे, याबाबतची वैद्यकीय चाचणी करावी लागणार आहे.

Related image

धवन तिसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत आता संदिग्धता आहे. धवन तिसऱ्या सामन्यात खेळणार की नाही हा निर्णय रविवारी सामन्यापूर्वीच घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी धवनचे वैद्यकीय अहवाल पाहिले जातील. त्याचबरोबर त्याचा फिटनेसही तपासला जाईल.

Related image


रोहितच्या दुखापतीबाबत कोहलीने दिली अपडेट; तिसरा धक्का बसणार...
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला. पण तरीही भारताच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. कारण भारताचा आता तिसरा धक्का बसू शकतो.

Image result for shikhar dhawan and rohit sharma injury against australia

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदवसीय सामन्यात भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत हा जायबंदी झाला होता. या दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या सामन्यातही खेळता आले नव्हते. त्याच्या जागी लोकेश राहुलने आता भारताच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

Image result for shikhar dhawan and rohit sharma injury against australia

भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे ३४१ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हा सामना ३६ धावांनी जिंकला. या सामन्यात रोहित क्षेत्ररक्षण करत असताना रोहितला दुखापत झाली होती. चेंडू पकडण्यासाठी रोहित धावत होता. चेंडू अडवताना रोहित पडला आणि त्यानंतर तो मैदानात येऊ शकला नाही. आता रोहितची दुखापत गंभीर स्वरुपाची आहे का, याबाबत भारताचा कर्णधार विराट कोहलीने अपडेट दिले आहेत.

Image result for shikhar dhawan and rohit sharma injury against australia

सामन्यानंतर विराट रोहितबाबत म्हणाला की, " दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना रोहितला दुखापत झाली. त्यानंतर त्याच्याॉवर मैदानातच उपचार सुरु केले होते. पण रोहितची दुखापत ही गंभीर स्वरुपाची नक्कीच नाही."

Web Title: India vs Australia: Shikhar Dhawan's skepticism about the third match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.