बर्मिंगहॅम, भारत विरुद्ध बांगलादेश : बांगलादेशवर विजय मिळवत भारताने उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. पण या सामन्यात साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले ते भारताच्या आज्जीबाईंनी. या आज्जीबाईंनी सामन्यात फुल टू धमाल केल्याचे पाहायला मिळाले. या आज्जीबाईंचे सामन्यातील व्हिडीओ चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत.
रोहित शर्माचे शतक आणि दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशला 28 धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. पण या सामन्या या आज्जीबाईंनी सर्वांची मने जिंकली. भारताच्या खेळाडूंनाही या आज्जीबाईंना भेटायचा मोह आवरता आला नाही. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि या लढतीतील सामनावीर रोहित शर्मा यांनीही या आज्जीबाईंची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले.
या आज्जीबाई नेमक्या आहेत तरी कोण...या आज्जीबाईंचे नाव चारुलता पटेल असून त्या 87 वर्षांचा आहेत. या आज्जीबाई सामना पाहायला व्हिलचेअरवर आल्या होत्या. पण या आज्जीबाईंनी जी सामन्यात धमाल केली, तेवढा आनंद कुणालाही लुटता आला नाही.
धोनी नसताना रीव्ह्यू घेतला आणि वाया गेलाबांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताने एक रीव्ह्यू घेतला. पण हा रीव्ह्यू घेताना महेंद्रसिंग धोनी यष्टीरक्षण करत नव्हता. धोनी नसताना यावेळी कर्णधार विराट कोहलीने रिषभ पंतचे ऐकून रीव्ह्यू घेतला. पण हा भारताचा रीव्ह्यू वाया गेल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रीव्ह्यू न घेतल्याने जेसन रॉयला जीवदान मिळाले होते.
ही गोष्ट घडली ती 12व्या षटकात. यावेळी मोहम्मद शमी गोलंदाजी करत होता. शमीचा एक चेंडू सौम्य सरकारच्या पॅडवर आदळला. त्यावेळी शमीसह भारतीय संघाने जोरदार अपील केले. पण मैदानावरील पंचांनी यावेळी सरकारला नाबाद ठरवले. त्यावेळी कोहलीने पंतला रीव्ह्यू घ्यायचा की नाही, याबाबत विचारले. त्यावेळी मला काहीच समजले नाही, असे उत्तर पंतने दिले. पण त्यावेळी हा चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर जात असल्याचेही पंतने कोहलीला सांगतिले नाही. त्यामुळे कोहलीने रीव्ह्यू घेतला आणि यामध्ये तो नापास झाल्याचे पाहायला मिळाले.
जेसन रॉय बाद होता, पण कोहलीनं DRS घेतला नाहीजेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडला सकारात्मक सुरुवात करून दिली. दुखापतीतून सावरणाऱ्या रॉयनं भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला, शिवाय त्याला नशीबाचीही साथ मिळाली. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्यानं टाकलेल्या 11 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रॉयला जीवदान मिळालं. रॉय व बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रॉय बाद असल्याची अपील भारतीय खेळाडूंनी केली, परंतु त्यावर DRS न मागितल्याचा फटका भारताला बसला.
पांड्यानं टाकलेला चेंडू व्हाईडच्या दिशेनं गेला, परंतु त्याला छेडछाड करण्याचा मोह रॉयला आवरता आला नाही. चेंडू त्याच्या ग्लोव्हजला घासून यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या हातात विसावला. धोनीनं त्वरित अपील केले, परंतु पंचांनी व्हाईडचा सिग्नल दिला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली व पांड्या धोनीकडे आले. पण, धोनीनं DRS न घेण्यास सांगितले. त्यानंतर रिप्लेत पाहिले असता रॉय बाद असल्याचे स्पष्ट दिसत होते, त्यामुळे DRS चा निर्णय घेतला असता तर भारताला पहिले यश मिळाले असते, असे चाहत्यांना वाटले.
इतिहास रचण्यापासून रोहित फक्त एक पाऊल दूर...भारताचा सलामीवीर रोहित शर्माने बांगलादेशविरुद्धच्या संघाविरुद्ध शतक झळकावले. रोहितचे हे विश्वचषकातील चौथे शतक ठरले. पण आता विश्वचषकात इतिहास रचण्यासाठी रोहित फक्त एक पाऊल दूर आहे.
एका विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक शतकांचा विक्रम श्रीलंकेचा माजी महान क्रिकेटपटू कुमार संगकाराच्या नावावर आहे. 2015 साली झालेल्या विश्वचषकात संगकाराने चार शतके झळकावली होती. रोहितनेही या विश्वचषकात चार शतक झळकावत संगकाराशी बरोबरी केली आहे. आता पुढील सामन्यात जर रोहितने शतक झळकावले तर तो इतिहास रचू शकतो.
रोहित शर्माच्या शतकानंतर भारताची बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले. रोहित फलंदाजी करत असताना भारतीय संघ चारशे धावांच्या जवळपास जाईल, असे वाटत होते. पण रोहित बाद झाल्यावर मात्र भारताला साडे तिनशे धावांचा टप्पाही गाठता आला नाही. पण भक्कम पायाच्या जोरावर भारताला बांगलादेशपुढे --- धावांचे आव्हान ठेवता आले.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय अचूक असल्याचे रोहितने दाखवून दिले. रोहितला यावेळी लोकेश राहुलचीही चांगली साथ मिळाली. रोहित आणि लोकेश या दोघांनी मिळून 29.2 षटकांत 180 धावांची सलामी दिली. रोहितने यावेळी विश्वचषकातील चौथे शतक झळकावले. पण गेल्या सामन्यासारखेच रोहितला शतकानंतर मोठी खेळी साकारता आली नाही. रोहितने 92 चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 104 धावांची खेळी साकारली.
रोहित बाद झाल्यावर काही वेळात राहुलही बाद झाला. राहुलने सहा चौकार आणि एका षटाकाराच्या जोरावर 77 धावा केल्या. या दोघांनंतर एकाही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. रिषभ पंतने 48 धावांची खेळी साकारली, पण यावेळीही तो बेजबाबदारपणे बाद झाला.
विश्वचषकात रोहित 'टॉप'वर; चौथ्या शतकसह गाठले शिखरबांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावत रोहित शर्मा विश्वचषकात 'टॉप'वर पोहोचला आहे. या खेळीनंतर रोहित विश्वचषकातील शिखरावर पोहोचला आहे. या सामन्यात रोहितने काही विक्रम रचत असताना ही दमदार कामगिरीही केली आहे.
यंदाच्या विश्वचषकातील रोहितचे हे चौथे शतक ठरले. त्याचबरोबर रोहितने एक अर्धशतकही झळकावले आहे. या सामन्यातील शतकासह रोहितने यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहितच्या नावावर या विश्वचषकात सर्वाधिक 544 धावा झाल्या आहेत. हा अव्वल क्रमांक पटकावताना रोहितने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला पिछाडीवर टाकले आहे.