लंडन : हुकमी फलंदाज जो रुट (११३) याचे शानदार शतक आणि त्यानंतर लियाम प्लंकेटची (४/४६) अचूक गोलंदाजी या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ८६ धावांनी पराभव केला. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने १-१ अशी बरोबरी साधली. त्यामुळे आता मंगळवारी होणारा सामना मालिका विजयासाठी निर्णायक असेल. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ५० षटकात ७ बाद ३२२ धावांची मजल मारल्यानंतर त्यांनी भारताचा डाव २३६ धावांत संपुष्टात आणला.
लॉडर््स स्टेडियमव झालेल्या या सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. मात्र रोहित शर्माच्या रुपाने पहिला बळी गेल्यानंतर ठराविक अंतराने भारताचे फलंदाज बाद होत राहिली. कर्णधार विराट कोहली (४५) आणि सुरेश रैना (४६) तिसºया गड्यासाठी ८० धावांची भागीदारी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोहली बाद झाल्यानंतर प्लंकेटने भारताची मधली फळी उध्वस्त केली. महेंद्रसिंग धोनी व हार्दिक पांड्या यांनी संथ फलंदाजी केल्याचा फटका बसल्याने आवश्यक धावगती भारताच्या अवाक्याबाहेर गेली. डेव्हिड विली व आदिल राशिद यांनीही प्रत्येकी २ बळी घेतले.
तत्पूर्वी रुटच्या जोरावर इंग्लंडने मजबूत धावसंख्या उभारली. चायनामन कुलदीप यादवपुढे पुन्हा एकदा इंग्लिश फलंदाज कोलमडले खरे, परंतु, रुट आणि कर्णधार इयॉन मॉर्गन (५३) यांच्या जोरावर इंग्लंडने दमदार मजल मारली. कुलदीपने ६८ धावांत ३ बळी घेतले. जेसन रॉय - जॉनी बेयरस्टॉ यांनी ६९ धावांची सलामी दिली. यानंतर कुलदीपने ३ बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. जो रुट व इयॉन मॉर्गन यांनी तिसºया गड्यासाठी १०३ धावांची भागीदारी केली. कुलदीपनेच मॉर्गनला बाद केले. मॉर्गनने ५१ चेंडूत ५३ धावा केल्या. यानंतर रुटने सर्व सूत्रे आपल्याकडे घेताना अखेरपर्यंत किल्ला लढवला. त्याने ११६ चेंडूत ८ चौकार व एका षटकारासह ११३ धावांची खेळी केली. डावातील अखेरच्या चेंडूवर रुट धावबाद झाला.
----------------
- धोनीच्या 10000 धावा पूर्ण, अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय, 2 यष्टीरक्षक आणि 12 वा फलंदाज ठरला आहे.
- उमेश यादव भोपळा न फोडताच माघारी, भारताच्या 7 बाद 192 धावा
- हार्दिक पांड्या बाद झाल्याने भारताच्या अडचणीत वाढ
- रैनालाही अर्धशतकाने हुलकावणी दिली
- मोईन अलीने कोहलीला केले पायचीत
- विराट कोहली आणि सुरेश रैना यांच्या अर्धशतकी भागिदारीने भारताला सावरले
- भारताच्या 15 षटकांत 3 बाद 87 धावा
- लोकेश राहुल आऊट, भारताला तिसरा धक्का
- भारताच्या 10 षटकांत 2 बाद 57 धावा
- भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा 15 धावांवर त्रिफळाचीत
मजबूत 'रूट'मुळे इंग्लंड भक्कम, भारताला 323 धावांचे आव्हान
लंडन - लॉर्ड्स येथील दुस-या वन डे सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी संघाला दमदार सुरूवात करून दिली. पुन्हा एकदा कुलदीप यादवच्या फिरकीसमोर त्यांना गिरकी आली. सलामीचे हे दोन्ही फलंदाज कुलदीपने माघारी धाडले. मात्र जो रूटने एकहाती खिंड लढवताना इंग्लंडला 7 बाद 322 धावांचा पल्ला गाठून दिला. कर्णधार इयॉन मॉर्गनने उपयुक्त अर्धशतकी खेळी केली. रूटने कारकीर्दितील 12 वे शतक झळकावले. डेव्हिड विलीनेही आतषबाजी केली. त्याने 30 चेंडूंत 50 धावा केल्या. तो अखेरच्या चेंडूवर बाद झाला.
- जो रूटचे शतक, इंग्लंड 48 षटकांत 6 बाद 300 धावा
- मोईन अली बाद, चहलला पहिले यश
- इंग्लंडच्या 40 षटकांत 5 बाद 229 धावा
- इंग्लंडला पाचवा झटका, बटलर बाद
-बेन स्टोक्स आऊट, हार्दिक पांड्याला यश
- इंग्लंडने ओलांडला दोनश धावांचा पल्ला
- कुलदीपने मॉर्गनला बाद केले, शिखर धवनचा अप्रतिम झेल
- मॉर्गनचेही अर्धशतक
- 30 षटकांत 2 बाद 185 धावा
- जो रूटचे अर्धशतक, कारकीर्दितले 29वे तर लॉर्डवरील 5वे अर्धशतक
- इंग्लंडच्या दिडशे धावा, जो रूट व इयॉन मॉर्गनची संयमी खेळी
- इंग्लंड 20 षटकांत 2 बाद 121 धावा
- इंग्लंड 15 षटकांत 2 बाद 88 धावा
- इंग्लंडला दुसरा धक्का, रॉय 40 धावांवर माघारी
- कुलदीपला यश, बेअरस्टाे 38 धावांवर बाद
- जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांची फटकेबाजी, 10 षटकांत बिनबाद 69 धावा
- पाच षटकांत इंग्लंडच्या 31 धावा
इंग्लंडची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी
तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकत आधीच 1-0 ने आघाडी घेतली आहे. आज मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याचा विराटसेनाचा प्रयत्न असेल. आजच्या सामन्यात इंग्लंडकडून जोस बटलरला फलंदाजी क्रमामध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. त्याने पहिल्या सामन्यात सहाव्या क्रमांकावर खेळताना अर्धशतकी खेळी केली आणि फिरकीपटूंना समर्थपणे तोंड दिले होते. इंग्लंडचे गोलंदाज भारतीय फलंदाजांना बांधून ठेवण्यात अपयशी ठरले. पहिल्या सामन्यात विराट-रोहित-धवन यांनी दमदार फंलदाजी केली होती. या कामगिरीकडे पाहून असे दिसते की भारत ही मालिका 3-0 अशी जिंकू शकेल. त्यामुळे जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान आता भारताच्या कब्जात येऊ शकते. लॉर्ड्स येथील या लढतीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
असे आहेत दोन्ही संघ
-संक्षिप्त धावफलक :
इंग्लंड : ५० षटकात ७ बाद ३२२ धावा (जो रुट ११३, इयॉन मॉर्गन ५३, डेहिड विली ५०*; कुलदीप यादव ३/६८.) वि.वि. भारत : ५० षटकात सर्वबाद २३६ धावा (सुरेश रैना ४६, विराट कोहली ४५; लियाम प्लंकेट ४/४६, आदिल राशिद २/३८.)
Web Title: India vs England 2nd ODI: india vs england 2nd odi tour match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.