लंडन : लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटी सामन्याचे पहिले सत्र पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेले. खेळाडूंना यावेळी मैदानात उतरता आले नसले तरी पंचांनी लंच जाहीर केला. यावेळी लॉर्ड्सवर भारतीय खेळाडूंसाठी खास चिकन करी, पनीर टिक्का आणि बरेच भारतीय खाद्यपदार्था लंचच्या वेळी ठेवण्यात आले होती. भारतीय खेळाडूंनीही या आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांवर चांगलाच ताव मारला.
लॉर्ड्सवर भारतीय खेळाडूंसाठीचा पहिला दिवसाचा मेनू पाहा
परदेशात गेल्यावर सर्वात जास्त समस्या भेडसावते ती खाद्यपदार्थांची. कारण भारतात जसे खाद्यपदार्थ बनवले जातात, तसे ते परदेशात बनवले जात नाहीत. त्यामुळे परदेशात गेल्यावर आपल्याला भारतीय पद्धतीचे जेवण मिळावे, असे बऱ्याच जणांना वाटत असते. इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने या गोष्टीची दखल घेतली असून लॉर्ड्स कसोटी सामन्याच्यावेळी भारतीय क्रिकेटपटूंना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ देण्यात येणार आहेत.