Join us  

India vs England 3rd Test : दारुण पराभवानंतरही अहंकार कायम, खराब फलंदाजीबाबत विराट कोहलीने दोन शब्दांत दिलं असं उत्तर...

Virat Kohli News: लीड्स कसोटीतील दारुण पराभवानंतर भारतीय संघाच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 1:31 PM

Open in App

लंडन - लॉर्ड्स कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवून मालिकेत आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाला लीड्स कसोटीत मात्र दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाबरोबरच भारतीय संघाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत मिळवलेली आघाडीही गमावली आहे. लीड्स कसोटीतील दारुण पराभवानंतर भारतीय संघाच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे. तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात ७८ धावांमध्ये गारद होणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या डावा ६३ धावांमध्ये ८ फलंदाज गमावले. (Virat Kohli) त्यामुळे एकवेळ २ बाद २१५ असा सुस्थितीत असलेला भारतीय संघ सर्वबाद २७८ असा गडगडला होता. त्यामुळे भारतीय संघाला डाव आणि ७६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र या पराभवानंतरही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा अहंकार कायम असल्याचे चित्र आहे. (Even after the drastic defeat, ego remains, Virat Kohli gave the answer in two words about bad batting )

एकीकडे पराभवानंतर भारतीय फलंदाजीवर चौफेर टीका होऊ लागली आहे. शनिवारी सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत भारतीय फलंदाजांच्या अॅप्रोचवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावेळी एका रिपोर्टरने विचारले की, इंग्लंडचे गोलंदाज फुल लेंग्थवर गोलंदाजी करत होते. ते पॅडवर चेंडू टाकत होते. अशा परिस्थितीत भारतीय फलंदाज बॅकफुटवरा का खेळत होते. भारतीय फलंदाज धावा जमवण्यात अपयशी का ठरले? यावर विराट कोहलीने केवळ दोन शब्दांत उत्तर दिले. ओके थँक्स असे तो म्हणाला.

लीड्स कसोटी जिंकून इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये १-१ अशी बरोबरी साधली. पहिल्या दिवशी ७८ धावांमध्ये ऑल आऊट झाल्यावर भारतीय संघ पहिल्याच  दिवशी बॅकफुटवर गेला होता. त्यानंतर कर्णधार जो रूटच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात ४३२ धावा जमवल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत भारताने २ बाद २१५ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र चौथ्या दिवशी पहिल्याच सत्रात भारताचा डाव २७८ धावांवर संपुष्टात आला. आता मालिकेतील चौथा सामना २ सप्टेंबरपासून ओव्हलवर खेळवला जाणार आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ
Open in App