Join us  

India vs England 3rd Test Live : आरारा sss खतरनाक; इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोनं घेतला अफलातून कॅच, Video 

india vs England 2021 3rd test match live cricket score : टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ७८ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडनं ४३२ धावा घेताना ३५४ धावांची आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 5:46 PM

Open in App

india vs England 2021 3rd test match live cricket score : टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ७८ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडनं ४३२ धावा घेताना ३५४ धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या आघाडीच्या तीन फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली, तर जो रूटनं सलग तिसरे शतक झळकावताना भारतीय गोलंदाजांची परीक्षा घेतली. भारताचे सलामीवीर लोकेश राहुलरोहित शर्मा यांनी सकारात्मक सुरुवात केली, परंतु क्रेग ओव्हर्टनच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये जॉनी बेअरस्टोनं अफलातून झेल घेत टीम इंडियाला मोठा धक्का दिला. 

इंग्लंडनं सलामीला उतरवलेली हसीब हमीद ( ६८) आणि रोरी बर्न्स  ( ६१) ही नवी जोडीनं १३५ धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात करून दिली. कर्णधार जो रूट पुन्हा एकदा टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर अभेद्य भिंतीसारखा उभा राहिला. रूट व मालिकेत पहिलाच सामना खेळणाऱ्या डेविड मलान यांनी १३९ धावांची भागीदारी केली. मलान १२८ चेंडूंत ११ चौकारांसह ७० धावांवर माघारी परतला. ind vs eng 3rd test live scoreboard, ind vs eng 3rd test 

जसप्रीत बुमराहनं इंग्लंडच्या कर्णधाराचा झंझावात रोखला. बुमराहच्या चेंडूचा अंदाज घेण्यात यावेळी रूट चूकला अन् १६५ चेंडूंत १४ चौकारांसह १२१ धावा करून तो माघारी परतला. त्यानंतर रवींद्र जडेजानं मोईन अलीची ( २९) विकेट घेतली. इंग्लंडनं दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद ४२३ धावा केल्या होत्या आणि त्यात तिसऱ्या दिवशी फक्त ९ धावांची भार घातला आली. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक चार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात रोहित व लोकेशनं आश्वासक सुरुवात करत काही सुरेख फटके मारले. लोकेशला अम्पायरनं पायचीत बाद दिले होते, पंरतु त्यानं लगेच रिव्ह्यू घेतला आणि त्यामुळे तो वाचला. पण, त्याचा फायदा उचलण्यात तो अपयशी ठरला. लंच ब्रेक होण्यापूर्वीच्या षटकात लोकेश ८ धावांवर माघारी परतला. भारताच्या १ बाद ३४ धावा झाल्या आहेत.

दरम्यान रोहितनं खणखणीत षटकार खेचून कसोटीत भारताकडून सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथे स्थान पटकावले. वीरेंद्र सेहवाग ( ९०), महेंद्रसिंग धोनी ( ७८), सचिन तेंडुलकर ( ६९), रोहित शर्मा ( ६२*) आणि कपिल देव ( ६१) हे टॉप फाईव्हमध्ये आहेत.  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितचा हा ४३९वा षटकार ठरला. ख्रिस गेल ५५० व शाहिद आफ्रिदी ४७६ षटकारांसह अव्वल दोन क्रमांकावर आहेत. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडलोकेश राहुलरोहित शर्मा
Open in App