India vs England 2nd Test : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत ३१७ धावांनी विजय मिळवला. आठ विकेट्स अन् शतक झळकावणाऱ्या आर अश्विनला ( R Ashwin) मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले. चेपॉक हे अश्विनचं घरचं मैदान आणि त्यामुळे त्याच्या कामगिरीचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. मैदानावरील अश्विनच्या प्रत्येक कृतीवर टाळ्यांचा कडकडाट होत होता. या विजयाचे श्रेय आर अश्विनलाच जाते आणि त्यामुळेच भारतानं मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. अश्विननेही प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाचे आभार मानले आणि आजचा विजय हा त्यांना समप्रित केला. भारतानं ऐतिहासिक विजय मिळवला, पण आर अश्विन मोठ्या पराक्रमाला मुकला!
''चेपॉकवर क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी, लोकं माझ्यासाठी टाळ्यांचा कडकडाट करतील..हे स्वप्न मी लहानपणी पाहिलं होतं. ८ वर्षांचा असताना मी या स्टेडियमवर आलो होतो. कसोटी सामना पाहताना मी येथील प्रत्येक स्टँडमध्ये फिरलो होतो. माझे वडील मला येथे घेऊन आले होते. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. मी इथे चार कसोटी सामने खेळलो आणि हा त्यापैकी सर्वात खास सामना ठरला. मला हिरो झाल्यासारखं वाटतंय,''असे अश्विन म्हणाला.. टीम इंडियाची गरूड भरारी, इंग्लंडला दुहेरी धक्का; मोडले गेले अनेक विक्रम!
''कोरोनाकाळातही मोठ्या संख्येनं प्रेक्षक आले. त्यांनी कशाचीच चिंता केली नाही. त्यांनी मास्कही घातले नव्हते, ते फक्त टाळ्यांचा कडकडाट करत होते आणि सामन्याचा आनंद लुटत होते. हा विजय मी चेन्नईतील या प्रेक्षकांना समर्पित करतो. प्रेक्षक नव्हते म्हणून आम्ही ०-१ अशा पिछाडीवर पडलो आणि त्यांच्या साथीनं आम्ही मालिका १-१ अशी बरोबरीत आणली,'' असेही तो म्हणाला.
अश्विननं मोडले अनेक विक्रम...- विराट कोहली आणि आर अश्विन या दोघांनी सातव्या विकेटसाठी १७७ चेंडूंत ९६ धावांची भागीदारी केली. विराट ६२ धावांवर ( १४९ चेंडू व ७ चौकार) माघारी परतला. चेपॉकवर सातव्या विकेटसाठी भारतीय जोडीनं केलेली ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी, करुण नायर व रवींद्र जडेजा यांनी २०१६मध्ये इंग्लंडविरुद्ध १३८ धावा आणि मोहम्मद कैफ व पार्थिव पटेल यांनी २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०४ धावांची भागीदारी केली होती. विराट कोहलीवर एका सामन्याच्या 'बंदी'ची टांगती तलवार; तिसऱ्या कसोटीत अजिंक्य रहाणे नेतृत्व करणार?
- टीम इंडियाकडून ८ किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना कसोटीत सर्वाधिक अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये अश्विननं ( ६) हरभजन सिंगला ( ५ अर्धशतकं) मागे टाकले. कपिल देव ८ अर्धशतकांसह अव्वल स्थानावर आहेत. रवींद्र जडेजा व सय्यद किरमानी यांच्या खात्यातही प्रत्येकी ५-५ अर्धशतकं आहेत. आर अश्विननं मोडला MS Dhoniचा विक्रम, चेन्नई कसोटी गाजवत नोंदवले अनेक पराक्रम!
- आर अश्विन इंग्लंडविरुद्ध १०००+ धावा आणि १०० विकेट्स घेणारा सातवा खेळाडू ठरला. यापूर्वी जॉर्ज गिफन ( ऑस्ट्रेलिया), माँटी नोबल ( ऑस्ट्रेलिया), गॅरी सोबर्स ( वेस्ट इंडिज) , रिचर्ड हॅडली ( न्यूझीलंड), कपिल देव ( भारत), शेन वॉर्न ( ऑस्ट्रेलिया), शॉन पोलॉक ( दक्षिण आफ्रिका) यांनी अशी कामगिरी केली आहे. कपिल देव यांच्यानंतर इंग्लंडविरुद्ध १००० धावा व १०० विकेट्स घेणारा अश्विन हा पहिलाच भारतीय आहे. कपिल देव यांनी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्धही अशी कामगिरी केली आहे.