लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचे फलंदाज ढेपाळले, अपवाद फक्त कर्णधार विराट कोहलीचा. इंग्लंडमध्ये फलंदाजी करणे सोपे नसते. त्यावेळी फलंदाजांनी नेमके काय करायला हवे आणि काय नाही, हे सल्ले भारताचे माजी कर्णधार आणि तंत्रशुद्ध फलंदाज अशी ख्याती असलेल्या सुनील गावस्कर यांनी केले आहे.
विराटच्या फलंदाजीबद्दल गावस्कर म्हणाले की, " विराटने त्याची मानसीकता बदलली आणि त्यामुळेच तो पहिल्या कसोटी सामन्यात जास्त धावा करू शकला. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट यामध्ये तफावत आहे. कारण दोन्ही प्रकारांमध्ये फलंदाजीत कसे बदल करायचे हे विराटने चांगले घोटवले आहे आणि त्यामुळेच तो पहिल्या कसोटी सामन्यात धावा करू शकला. "
धवन, राहुल आणि रहाणे का झाले झटपट बादतुम्हाला इंग्लंडमध्ये फलंदाजी करायची असेल, तर काही गोष्टी तुम्ही शिकायला हव्यात. इंग्लंडमध्ये खेळताना फलंदाजाने चेंडूवर जायचे नसते, तर चेंडूला बॅटवर यायला द्यायचे असते. शिखर धवन, लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे यांनी हीच चुक केली. त्यामुळेच त्यांना जास्त काळ खेळपट्टीवर तग धरून उभे राहता आले नाही, असे गावस्कर यांनी सांगितले.
भारतीय संघाचे नेमके काय चुकलेभारतीय खेळाडू चुकांमधून काहीच शिकलेले नाहीत. दक्षिण आफ्रिकेत त्यांच्यावर कसोटी मालिका गमावण्याची वेळ आली. कारण त्यांनी सराव सामना खेळला नव्हता. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत उतरताना तुम्ही अधिक सराव सामने खेळायला हवेत. त्याचबरोबर सतत सराव करत राहायला हवा. इसेक्सविरुद्धचा तीन दिवसीय सराव सामना त्यासाठी पुरेसा नक्कीच नाही, असे गावस्कर म्हणाले.