Join us  

India vs England Test: भारताला पाच दिवसांची सुट्टी महागात पडली

India vs England Test: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत पराभवाला सामोरे जाणा-या भारतीय संघाच्या सरावावर माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 9:48 AM

Open in App

लंडन - इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत पराभवाला सामोरे जाणा-या भारतीय संघाच्या सरावावर माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. स्विंग होणा-या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी भारतीय खेळाडूंनी गंभीरतेने सराव केला नसल्याची टीका त्यांनी केली आहे.

वन डे मालिकेतील पराभवानंतर भारतीय खेळाडूंना पाच दिवसांची विश्रांती देण्यात आली. त्यात खेळाडूंनी कुटुंबीयांसोबत युरोप भ्रमंती केली. त्यानंतर भारतीय संघाचे तीन दिवसीय सराव सामना खेळाला. त्या सामन्याला लक्ष्य करत गावस्कर म्हणाले, याला तुम्ही पूर्वतयारी म्हणता. एखादी मालिका संपल्यानंतर विश्रांती द्यायलाच हवे, पण म्हणून पाच दिवस ? दोन सामन्यांमध्ये 3-3 दिवसांची विश्रांती देता आली असती. 

सराव सामन्यांत सर्व 18 खेळाडूंना दिलेल्या संधीच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले, संघाने तीन दिवसांचे दोन सामने खेळायला हवे होते. पण, त्यात 11 खेळाडूंनाच संधी द्यायला हवी होती. सराव सामन्यांनाही त्यांनी कसोटी सामन्या इतकेच गांभीर्याने घ्यायला हवे. दक्षिण आफ्रिकेत त्यांनी दोन सराव सामने रद्द केले आणि त्यानंतर पहिल्या दोन कसोटीत संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडसुनील गावसकरक्रिकेटक्रीडा