लॉर्ड्स - महेंद्रसिंग धोनी आणि विक्रम हे घट्ट समीकरण बनले आहे. याची प्रचिती इंग्लंडविरूद्धच्या दुस-या वन डे सामन्यात आली. या लढतीत इंग्लंडने 86 धावांनी भारताला पराभव पत्करण्यास भाग पाडले. या सामन्यात धोनीने 59 चेंडूंत 37 धावांची संयमी खेळी केली. यासह त्याने वन डे क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा पल्लाही गाठला. याशिवाय धोनीच्या नावावर शनिवारी आणखी अनेक विक्रम नोंदवले गेले. सुरेश रैनाला बाद झाल्यानंतर धोनी फलंदाजीला आला. त्यावेळी भारताला विजयासाठी 113 चेंडूंत 168 धावांची आवश्यकता होती. धोनीने संयमी खेळ करून 37 धावांच्या खेळी दोन चौकार लगावले. पण, तो पराभव टाळू शकला नाही. भारताचा पराभव आणि धोनीच्या अपयशानंतरही हा सामना अविस्मरणीय ठरला. 14 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दित धोनीने वन डे क्रिकेटमध्या दहा हजार धावांचा पल्ला गाठला. वन डे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा तो बारावा फलंदाज ठरला. याआधी सचिन तेंडुलकर ( 18426), कुमार संगकारा (14234), रिकी पाँटिंग (14234), सनथ जयसुर्या ( 13430), महेला जयवर्धने (12650), इंझमाम-उल-हक (11739), जॅक कॅलिस (11579), सौरव गांगुली (11363), राहुल द्रविड ( 10899), ब्रायन लारा (10405), तिलकरत्ने दिलशान (10290) यांनी हा पल्ला पार केला आहे. यष्टीरक्षक म्हणून हा विक्रम करणारा तो कुमार संगकारानंतर (296 सामने) दुसरा खेळाडू ठरला. धोनीने 273 वन डे सामन्यांत हा पराक्रम केला आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs England : धोनीने सर केला विक्रमांचा शिखर, दी वॉल द्रविडलाही मागे टाकले
India vs England : धोनीने सर केला विक्रमांचा शिखर, दी वॉल द्रविडलाही मागे टाकले
महेंद्रसिंग धोनी आणि विक्रम हे घट्ट समीकरण बनले आहे. याची प्रचिती इंग्लंडविरूद्धच्या दुस-या वन डे सामन्यात आली.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 3:29 PM
ठळक मुद्दे300 झेल टिपणारा तो पहिला भारतीय तर चौथा यष्टीरक्षक बनला आहे.