India vs Ireland 1st T20I : विलंबाने सुरू झालेल्या सामन्यात भारतीय चाहत्यांचा उत्साह मात्र कमी केला नाही. ११.२० मिनिटांनी सुरू झालेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पहिल्या ८ चेंडूंत आयर्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar ) व कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यांनी हे धक्के देताना विक्रमाची नोंद केली.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पुन्हा पावसामुळे तीन तासांचा खेळ वाया गेला. पावसामुळे बराच वेळ वाया गेला आणि ही लढत १२-१२ षटकांची खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार १ ते ४ षटकं पॉवर प्ले राहणार आहे. तीन गोलंदाजांना प्रत्येकी दोन, तर दोन गोलंदाजांना प्रत्येकी ३ षटकं फेकता येणार आहेत. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात कमाल दाखवली. त्याने पाचव्या चेंडूवर अँडी बालबर्नीचा ( ०) त्रिफळा उडवला. ६व्या चेंडूवर गॅरेथ डेलनीच्या LBW साठी जोरदार अपील झाले अन् DRS ही घेतला गेला, परंतु तो वाया गेला. दुसऱ्या षटकात हार्दिक पांड्याने टाकलेला पहिला चेंडू पॉल स्टर्लिंगने कव्हरच्या दिशेने सीमापार पाठवला. पुढचा चेंडूवर त्याने उत्तुंग फटका मारला, परंतु दीपक हुडाने अलगद झेल घेतला.