India vs Ireland 1st T20I : भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar ) व कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यांनी पहिल्या ८ चेंडूंत आयर्लंडच्या सलामीवीरांना माघारी पाठवले. भुवी व हार्दिक यांनी विक्रमाची नोंद केल्यानंतर आयर्लंडच्या अन्य फलंदाजांनी चांगले पुनरागमन करून दिले. हॅरी टेक्टर ( Harry Tector) व लोर्कन टकर ( Lorcan Tucker) यांनी २९ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाला टफ फाईट दिली. पदार्पणवीर उम्रान मलिकला ( Umran Malik) अपेक्षित सुरुवात करता आली नाही. त्याने पहिल्या षटकात १८ धावा दिल्या.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पुन्हा पावसामुळे तीन तासांचा खेळ वाया गेला. पावसामुळे बराच वेळ वाया गेला आणि ही लढत १२-१२ षटकांची खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात कमाल दाखवली. त्याने पाचव्या चेंडूवर अँडी बालबर्नीचा ( ०) त्रिफळा उडवला. ६व्या चेंडूवर गॅरेथ डेलनीच्या LBW साठी जोरदार अपील झाले अन् DRS ही घेतला गेला, परंतु तो वाया गेला. दुसऱ्या षटकात
हार्दिक पांड्याने टाकलेला पहिला चेंडू पॉल स्टर्लिंगने कव्हरच्या दिशेने सीमापार पाठवला. पुढचा चेंडूवर त्याने उत्तुंग फटका मारला, परंतु दीपक हुडाने अलगद झेल घेतला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक ३४ विकेट्स घेण्याच विक्रम भुवीच्या नावे नोंदवला गेला आहे. सॅम्युएल बद्री ( ३३) व टीम साऊदी ( ३३) यांचा विक्रम भुवीने मोडला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त गोलंदाजी करणारा आणि विकेट मिळवणारा हार्दिक पांड्या हा भारताचा पहिलाच कर्णधार ठरला. चौथ्या षटकात आवेश खानने आयर्लंडला धक्का दिला आमि गॅरेथ डेलनी ( ८) यष्टिरक्षक दिनेश कार्तिकच्या हाती झेल देऊन परतला. पदार्पणवीर उम्रान मलिकने पहिलाच चेंडू १४८ kmph च्या वेगाने टाकला, परंतु त्याने पहिल्याच षटकात १८ धावा दिल्या. हॅरी टेक्टरने उभ्या उभ्या मारलेला षटकार पाहण्यासारखा होता. त्यानंतर लोर्कन टकर ( Lorcan Tucker) ने हार्दिकला दोन खणखणीत षटकार खेचले.
टकर व टेक्टर यांची २९ चेंडूंतील ५० धावांची भागीदारी युजवेंद्र चहलने संपुष्टात आणली. टकरने ( १८) मारलेला उत्तुंग चेंडू अक्षर पटेलने सीमारेषेवर टिपला. चहलने त्याच्या ३ षटकांत ११ धावा देताना १ विकेट घेतली. भुवीनेही ३-१-१६-१ अशी कामगिरी केली. टेक्टरने २९ चेंडूंत ट्वेंटी-२०तील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. ५४ धावांवर टेक्टरला अक्षर पटेलने जीवदान दिले. टेक्टरने ३३ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ६४ धावा केल्या. आयर्लंडनं ४ बाद १०८ धावा केल्या.
Web Title: India vs Ireland 1st T20I : Harry Tector - 64* runs from just 33 balls including 6 fours and 3 sixes helped Ireland to post 108 for 4 from 12 overs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.