India vs Ireland 1st T20 I: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली ( Hardik Pandya) गुजरात टायटन्सने पहिल्याच प्रयत्नात आयपीएल २०२२ जेतेपद पटकावून करिष्मा केला. आता त्याने टीम इंडियाचे नेतृत्व करताना पहिल्याच सामन्यात ६३ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची पुनरावृत्ती केली. आयर्लंडविरुद्धच्या दोन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत हार्दिकच्या खांद्यावर टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सामन्यात पाऊस व्यत्यय घालण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आजच्या सामन्यात उम्रान मलिकला ( Umran Malik) पदार्पणाची अखेर संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला पाचही सामन्यात बाकावर बसवून ठेवले होते.
दरम्यान, पावसामुळे सामना उशीरा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण, लगेच ऊन आले अन् सामना सुरू झाला. परवेझ रसूलनंतर भारताकडून खेळणारा मलिक हा जम्मू-काश्मीरचा दुसरा खेळाडू ठरला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ( India won the toss and decided to bowl first.)
भारतीय संघ - ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल. उम्रान मलिक