India vs Ireland 1st T20 I: नाणेफेक होऊन जवळपास तीन तास उलटूनही भारत-आयर्लंड सामना सुरू झालेला नाही. पावसाचा लंपडाव सुरू आहे आणि खेळाडू खेळपट्टीवर येताच पुन्हा पाऊस एन्ट्री घेतानाचे चित्र सध्या दिसतेय.. दोन-तीन वेळा सूर्याने तोंड दाखवल्यानंतरही क्षणार्धात लगेच पाऊस पडतोय. त्यामुळे सामन्याला विलंब झाला आहे. पण, जर १२ वाजेपर्यंत पाऊस न थांबल्यास पहिली ट्वेंटी-२० लढत रद्द केली जाईल.
आयर्लंडविरुद्धच्या दोन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत हार्दिक पांड्याच्या खांद्यावर टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सामन्यात पाऊस व्यत्यय घालण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आजच्या सामन्यात उम्रान मलिकला ( Umran Malik) पदार्पणाची अखेर संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला पाचही सामन्यात बाकावर बसवून ठेवले होते.परवेझ रसूलनंतर
भारताकडून खेळणारा मलिक हा जम्मू-काश्मीरचा दुसरा खेळाडू ठरला.
दरम्यान, पावसामुळे सामना उशीरा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण, लगेच ऊन आले अन् नाणेफेक झाली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेकीनंतर पावसाने लपंडावाला सुरूवात केली. दोन-तीन वेळा विश्रांती घेऊन तो पुन्हा पुन्हा परतत आहे...
भारतीय संघ - ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल. उम्रान मलिक
Web Title: India vs Ireland 1st T20I : India Vs Ireland 1st T20i will be called off if the game doesn't start before 12am
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.