India vs Ireland 1st T20 I: नाणेफेक होऊन जवळपास तीन तास उलटूनही भारत-आयर्लंड सामना सुरू झालेला नाही. पावसाचा लंपडाव सुरू आहे आणि खेळाडू खेळपट्टीवर येताच पुन्हा पाऊस एन्ट्री घेतानाचे चित्र सध्या दिसतेय.. दोन-तीन वेळा सूर्याने तोंड दाखवल्यानंतरही क्षणार्धात लगेच पाऊस पडतोय. त्यामुळे सामन्याला विलंब झाला आहे. पण, जर १२ वाजेपर्यंत पाऊस न थांबल्यास पहिली ट्वेंटी-२० लढत रद्द केली जाईल.
दरम्यान, पावसामुळे सामना उशीरा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण, लगेच ऊन आले अन् नाणेफेक झाली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेकीनंतर पावसाने लपंडावाला सुरूवात केली. दोन-तीन वेळा विश्रांती घेऊन तो पुन्हा पुन्हा परतत आहे...