05 Feb, 20 03:57 PM
05 Feb, 20 03:32 PM
न्यूझीलंडचे तीन फलंदाज झटपट माघारी परतल्यामुळे सामन्यात चुरस निर्माण झाली. टॉम लॅथम, जिमी निशॅम आणि कॉलीन डी ग्रँडहोम यांची विकेट सामन्याला कलाटणी देते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
05 Feb, 20 03:11 PM
42व्या षटकात ही जोडी तुटली. कुलदीपनं भारताला विकेट मिळवून दिली. टॉम 48 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकार खेचून 69 धावांवर माघारी परतला.
05 Feb, 20 03:06 PM
निकोल्स 82 चेंडूंत 11 चौकारांसह 78 धावा करून माघारी परतला. तरीही किवींनी धावांची सरासरी जवळपास सहाची ठेवली होती. रॉस टेलरनं अर्धशतक पूर्ण करताना किवींच्या आशा कायम राखल्या होत्या. 35 षटकापर्यंतच्या टीम इंडियाच्या धावांच्या तुलनेत किवी खूप पुढे होते. कर्णधार टॉम लॅथमनं चौथ्या विकेटसाठी रॉसला तोडीसतोड साथ देताना अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना भारतीय गोलंदाजांना हतबल केले. टॉम लॅथम व रॉस यांनी वाहत्या गंगेत हात धुवावे तसे भारतीय गोलंदाजांना बदडले.
05 Feb, 20 03:06 PM
05 Feb, 20 02:01 PM
, 29व्या षटकात एक धाव चोरण्याच्या नादात किवींनी मांडलेला डाव मोडला. विराटनं चपळ क्षेत्ररक्षण करताना निकोल्सला धावबाद केले. निकोल्स 82 चेंडूंत 11 चौकारांसह 78 धावा करून माघारी परतला.
05 Feb, 20 01:51 PM
त्यानंतर कुलदीप यादवनं ब्लंडेलला माघारी पाठवलं. लोकेश राहुलनं जलद स्टम्पिंग केली. पण, कुलदीपनेच किवींच्या रॉस टेलरचा सोपा झेल सोडला. त्याच टेलरनं तिसऱ्या विकेटसाठी निकोल्ससह अर्धशतकी भागीदारी केली.
05 Feb, 20 01:16 PM
05 Feb, 20 01:11 PM
15 षटकांत किवींनी बिनबाद 83 धावा केल्या होत्या. पण, 16वं षटक किवींसाठी धोक्याचं ठरलं. शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर अपरकट मारण्याचा प्रयत्न करणारा मार्टीन गुप्तील ( 32) केदार जाधवच्या हाती झेल देऊन माघारी परतला.
05 Feb, 20 01:10 PM
05 Feb, 20 01:05 PM
05 Feb, 20 01:05 PM
लक्ष्याचा पाठलाग करताना मार्टीन गुप्तील आणि हेन्री निकोल्स यांनी सावध सुरुवात करताना संघाला पहिल्या दहा षटकांत बिनबाद 54 धावा केल्या. या दोघांनी हळुहळु धावांचा वेग वाढवला. भारतीय गोलंदाजांना किवी फलंदाजांना बाद करण्यात अपयश आलेले पाहायला मिळाले. 15 षटकांत किवींनी बिनबाद 83 धावा केल्या होत्या.
05 Feb, 20 12:41 PM
लक्ष्याचा पाठलाग करताना मार्टीन गुप्तील आणि हेन्री निकोल्स यांनी सावध सुरुवात करताना संघाला पहिल्या दहा षटकांत बिनबाद 54 धावा केल्या.
05 Feb, 20 12:22 PM
05 Feb, 20 11:38 AM
05 Feb, 20 11:29 AM
05 Feb, 20 11:05 AM
श्रेयस आणि लोकेश यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं कूच करून दिली. श्रेयसनं वन डे कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावले. त्याला लोकेशची तोडीसतोड साथ मिळाली. या दोघांची चौथ्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी टीम साउदीनं संपुष्टात आणली. श्रेयस 107 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकार खेचून 103 धावांवर मिचेल सँटनरच्या हाती झेलबाद झाला.
05 Feb, 20 10:54 AM
05 Feb, 20 10:20 AM
05 Feb, 20 10:12 AM
खेळपट्टीवर तग धरलेल्या श्रेयसनेही अर्धशतक पूर्ण केले. वन डे क्रिकेटमधील त्यानं 7वे वैयक्तिक अर्धशतक झळकावताना संघाला मजबूत स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला. श्रेयसनं काही उत्तुंग षटकारही खेचले. त्यानं चौथ्या विकेटसाठी लोकेश राहुलसह अर्धशतकी भागीदारी केली आणि संघाला दोनशे धावांचा पल्ला पार करून दिला.
05 Feb, 20 10:12 AM
05 Feb, 20 09:53 AM
05 Feb, 20 09:51 AM
खेळपट्टीवर तग धरलेल्या श्रेयसनेही अर्धशतक पूर्ण केले. वन डे क्रिकेटमधील त्यानं 7वे वैयक्तिक अर्धशतक झळकावताना संघाला मजबूत स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला.
05 Feb, 20 09:42 AM
विराट अन् श्रेयसची 102 धावांची भागीदारी इश सोढीनं सुंपष्टात आणली. 29व्या षटकातील चौथा चेंडू मॅजिकल ठरला. सोढीनं टाकलेल्या त्या चेंडूनं विराटच्या बॅट-पॅडमधून वाट काढत यष्टिंचा वेध घेतला. विराटही काही काळ हतबल झालेला पाहायला मिळाला. तो 63 चेंडूंत 6 चौकारांसह 51 धावा करून तंबूत परतला.
05 Feb, 20 09:37 AM
विराटनं वन डेतील 58 वे अर्धशतक पूर्ण करताना भारताला मोठ्या आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली. विराटनं 61 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
05 Feb, 20 09:36 AM
05 Feb, 20 09:20 AM
05 Feb, 20 09:19 AM
कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. अय्यरला नशीबानं साथ दिली हेही तितकंच खरं. त्याचे दोन झेल किवी फलंदाजांनी सोडले. त्यानंतर श्रेयसने बचावात्मक खेळ केला आणि कोहली दुसऱ्या बाजूनं फटकेबाजी करत होता. या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना संघाची सरासरी सहाच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न केला.
05 Feb, 20 08:37 AM
वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल या भारतीय सलामीवीरांनी साजेशी सुरुवात केली. दोघांनी आठ षटकांत अर्धशतकीय भागीदारी केली. पण, आठव्या षटकातील अखेरच्या चेंडूनं ही जोडी तोडली. कॉलीन डी ग्रँडहोमनं पृथ्वीला ( 20) यष्टिरक्षक टॉम लॅथम करवी झेलबाद करून माघारी पाठवले. पुढच्याच षटकात मयांकही माघारी परतला. टीम साउदीच्या गोलंदाजीवर पॉईंटवर उभ्या असलेल्या टॉम ब्लंडेल यानं अप्रतिम झेल टीपत मयांकला ( 32) तंबूत जाण्यास भाग पाडले. ( IND Vs NZ, 1st ODI : पृथ्वी शॉ-मयांक अग्रवाल जोडीनं 1976नंतर न्यूझीलंडमध्ये घडवला पराक्रम )
05 Feb, 20 07:48 AM
भारताच्या 11 धावा
3.3 षटकात भारताच्या 11 धावा झाल्या आहेत.
05 Feb, 20 07:30 AM
न्यूझीलंड संघातील खेळाडू
टॉम लॅथम (कर्णधार व विकेटकीपर), मार्टिन गुप्टिल, रॉस टेलर, कॉलिन डी ग्रँडहोम, जिमी निशम, स्कॉट कुगलेइजन, टॉम ब्लंडेल, हेन्री निकोल्स, मिशेल सँटनर, हॅमिश बेनेट, ईश सोढी, टीम साऊदी, काइल जेमिसन आणि मार्क चॅपमेन.
05 Feb, 20 07:20 AM
भारतीय संघातील खेळाडू
विराट कोहली (कर्णधार), पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, केएल राहुल (विकेटकीपर), मनीष पांडे, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनी.
05 Feb, 20 07:25 AM
पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल यांचे संघात पदार्पण
05 Feb, 20 07:14 AM