Join us  

IND Vs NZ, 1st ODI : पृथ्वी शॉ-मयांक अग्रवाल जोडीनं 1976नंतर न्यूझीलंडमध्ये घडवला पराक्रम

भारत विरुद्ध न्यूझीलंड : ट्वेंटी-20 मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ वन डे मालिकेतही न्यूझीलंडवर विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 8:28 AM

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड : ट्वेंटी-20 मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ वन डे मालिकेतही न्यूझीलंडवर विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहे. पण, या मालिकेपूर्वी भारताचा सलामीवीर रोहित शर्माने दुखापतीमुळे माघार घेतली. त्यामुळे वन डे संघात मयांक अग्रवालला संधी मिळाली, तर कसोटीत पृथ्वी शॉनं पुनरागमन केलं. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात नवीन सलामीवीर मैदानावर उतरतील हे निश्चित होतं. कर्णधार विराट कोहलीनं सामन्याच्या पूर्वसंध्येला याचे संकेत दिले होते. त्यानुसार आज पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी वन डेत पदार्पण केले. एकाच वन डे सामन्यात पदार्पण करणारी ही भारताची चौथी भारतीय जोडी आहे. पण, पृथ्वी आणि मयांक या जोडीनं 1976नंतर कोणत्याच भारतीय सलामीवीरांना न जमलेला विक्रम नावावर केला.

या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी शिखर धवनला दुखापत झाली आणि त्यानं मालिकेतूनच माघार घेतली. त्याच्या जागी संघात पृथ्वी शॉला संधी देण्यात आली. त्यात आता रोहितनं माघार घेतल्यानं वन डे संघातील नियमित सलामीची जोडीच नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या ट्वेंटी-20 सामन्यांत रोहितला दुखापत झाली. त्यानंतर त्यानं वन डे मालिकेतून माघारच घेतली. त्यामुळे आजच्या सामन्यात पृथ्वी आणि मयांक या दोघांनी वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. एकाच सामन्यात पदार्पण करणारी ही भारताची चौथी सलामीची जोडी आहे. पण, 1976नंतर न्यूझीलंडमध्ये पदार्पण करणारे पहिलेच भारतीय सलामीवीर ठरले आहेत. 1976मध्ये दिलीप वेंगसरकर आणि पार्थसारथी शर्मा यांनी न्यूझीलंडमध्ये एकाच वन डे सामन्यातून पदार्पण केले होते. 

एकाच सामन्यात पदार्पण करणारे भारताचे सलामीवीरसुनील गावस्कर / एस नाईक वि. इंग्लंड, लीड्स, 1974पार्थसारथी शर्मा/ दिलीप वेंगसरकर वि. न्यूझीलंड, ख्राईस्टचर्च, 1976लोकेश राहुल/करुण नायर वि. झिम्बाब्वे, हरारे, 2016पृथ्वी शॉ / मयांक अग्रवाल वि. न्यूझीलंड, हॅमिल्टन, 2020 

1976च्या त्या सामन्यात काय झालं होतं?पार्थसारथी शर्मा आणि दिलीप वेंगसरकर यांनी 1976मध्ये न्यूझीलंड दौऱ्यातून एकाच सामन्यात पदार्पण केले होते. त्या सामन्यातही भारतीय संघ प्रथम फलंदाजीला आला होता. शर्मा आणि वेंगसरकर अनुक्रमे 6 व 16 धावा करून माघारी परतले. गुंडप्पा विश्वनाथ यांनी 56 धावांची खेळी करताना संघाला 154 धावांपर्यंत मजल मारून दिली. न्यूझीलंडच्या रिचर्ड कॉलिंगे यांनी 23 धावा देत भारताचा निम्मा संघ माघारी पाठवला होता. लान्स केईर्न्स आणि डॅयली हॅडली यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या होत्या. न्यूझीलंडनं हे लक्ष्य एक विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. कर्णधार ग्लेन टर्नर यांनी नाबाद 63, तर बेव्हन काँगडॉन यांनी नाबाद 45 धावा केल्या. जॉक एडवर्डला ( 41) बिशन बेदी यांनी बाद केले.

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडपृथ्वी शॉमयांक अग्रवाल