न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या तीन फलंदाजांनी अर्धशतके लगावली, पण तरीही भारताला पहिल्या डावात तिनशे धावांचा पल्ला गाठता आला नाही. पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांच्या अर्धशतकांनंतरही भारताचा पहिला डाव २४२ धावांत संपुष्टात आला.
पहिल्या सत्रात पृथ्वी शॉ बाद झाला. पण बाद होण्यापूर्वी पृथ्वीने ६४ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५४ धावांची खेळी साकारली होती. दुसऱ्या सत्रात विहारी बाद झाला. विहारीने १० चौकारांच्या जोरावर ५५ धावा केल्या. तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला पुजारा बाद झाला आणि त्याने सहा चौकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या.
विराट Kohliला सर्वाधिक बाद करण्याचा विक्रम आता टीम साऊथीच्या नावावरभारतासाठी करो या मरो असलेल्या सामन्यात कर्णधार विराट कोहली मोठी खेळी साकारेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण या कसोटीच्या दुसऱ्या डावात कोहलीला फक्त तीन धावाच करता आल्या. यावेळी कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीच्या नावावर जमा झाला आहे.
अर्धशतकवीर पृथ्वी शॉ बाद झाल्यावर कोहली फलंदाजीला आला. लंचपर्यंत कोहली खेळत होता. पण लंचनंतर कोहली झटपट बाद झाला. यावेळी साऊथीने कोहलीला पायचीत पकडले आणि त्याला स्वस्तात तंबूत धाडले.
कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम साऊथीने नोंदवला आहे. साऊथीने आतापर्यंत सर्वाधिक दहा वेळा कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये बाद केले आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडचा फिरकीपटू ग्रॅमी स्वानच्या नावावर होता.