ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट : अनुभवी खेळाडू मिताली राजचे भारताच्या ट्वेंटी-20 संघातील स्थान, हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात मितालीला न खेळवल्याने कर्णधार हरमनप्रीत कौरवर टीका झाली. पहिल्या सामन्यात 1 बाद 102 अशा मजबूत स्थितीत असलेल्या भारतीय संघाची दाणादाण उडाली आणि संपूर्ण संघ 136 धावांवर माघारी परतला. मधल्या फळीत एकाही खेळाडूला खेळपट्टीवर टिकून खेळ करता आला नाही आणि भारतीय संघाला 23 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मालिकेत कमबॅक करण्यासाठी मितालीला खेळवण्याची मागणी होत आहे. मात्र, शुक्रवारी होणाऱ्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात मितालीला संधी मिळेल की नाही याबाबत अद्याप संभ्रमता आहे.(टीम इंडियाचा बुलंद आवाssज.... मिताली राज!)न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेल्या 160 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना प्रिया पुनिया ( 4) लगेच माघारी परतला. मात्र, स्मृती मानधना व जेमिमा रॉड्रिग्ज या महाराष्ट्राच्या कन्यांनी किवी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. 2018 सालची आयसीसीची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू ठरलेल्या स्मृतीने या सामन्यात विश्वविक्रमाला गवसणी घातली. तिने अवघ्या 24 चेंडूंत 50 धावा करताना महिला क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम नावावर केला. स्मृती व जेमिमा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली. पण, स्मृती ( 58) व जेमिमा ( 39) मागोमाग तंबूत परतल्याने भारताच्या अडचणी वाढल्या. त्यानंतर अवघ्या 34 धावांत भारताचे 9 फलंदाज तंबूत परतले. ़
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs New Zealand 2nd T20I: मिताली राजच्या संघ समावेशाची संभ्रमता कायम, हरमनप्रीत कौरसमोर पेच
India vs New Zealand 2nd T20I: मिताली राजच्या संघ समावेशाची संभ्रमता कायम, हरमनप्रीत कौरसमोर पेच
India vs New Zealand 2nd Women's T20I: अनुभवी खेळाडू मिताली राजचे भारताच्या ट्वेंटी-20 संघातील स्थान, हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 4:29 PM
ठळक मुद्देभारत-न्यूझीलंड महिला संघाचा दुसरा ट्वेंटी-20 सामना शुक्रवारीपहाटे 6.55 मिनिटांनी सुरु होणार सामनाभारतीय महिला संघासमोर मालिकेत बरोबरी मिळवण्याचे आव्हान