भारतीय संघानं पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवताना न्यूझीलंडवर 5-0 असा दणदणीत विजय मिळवला. भारतानं फलंदाजी अन् गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी करताना किवी संघाची दाणादाण उडवली. त्यात भारतीय गोलंदाजांनी दोन सामन्यात किवींच्या तोंडचा घास पळवताना सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिला. ट्वेंटी-20 मालिकेनंतर टीम इंडिया आता तीन सामन्यांची वन डे आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाली आहे. 5 फेब्रुवारीला पहिला वन डे सामना खेळवण्यात येणार आहे. पण, ट्वेंटी-20 मालिकेतील विजयानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) टीम इंडियाला दंड ठोठावला आहे.
NZ vIND : Team India ला मोठा धक्का; वन डे, कसोटी मालिकेतून प्रमुख खेळाडूची माघार?
ICC T20I Rankings मध्ये KL Rahulची गरूड झेप; विराट, रोहित यांनाही टाकलं मागे
मालिकेतील पाचव्या सामन्यात टीम इंडियानं 7 धावांनी विजय मिळवला. या विजयासह पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका जिंकणारा भारत हा पहिलाच संघ ठरला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियानं 3 बाद 163 धावा केल्या. लोकेश राहुलनं 33 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 45 धावा केल्या. सलामीला संधी मिळालेल्या संजू सॅमसन पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर आलेल्या रोहित शर्मानं तुफान फटकेबाजी केली. त्यानं 41 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकार खेचून 60 धावा केल्या. दुखापतीमुळे त्याला सामना सोडावा लागला. श्रेयस अय्यरनं 31 चेंडूंत नाबाद 33 धावा केल्या. त्यात एक चौकार व दोन षटकारांचा समावेश होता.
लक्ष्याचा पाठलाग करताना किवींकडून टीम सेइफर्ट आणि रॉस टेलर यांनी अर्धशतकी खेळी केली. सेइफर्टनं 30 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकारांसह 50 धावा केल्या. टेलरनं 47 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 53 धावा केल्या. जसप्रीत बुमराहनं 12 धावांत 3 विकेट्स घेतल्या. त्याला नवदीप सैनी व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत चांगली साथ दिली. पण, या सामन्यानंतर
आयसीसीनं टीम इंडियावर दंडात्मक कारवाई केली. षटकांचा वेग संथ राखल्यामुळे आयसीसीनं टीम इंडियाला मॅच फीपैकी 20 टक्के रक्कम दंड म्हणून भरण्यास सांगितली आहे.
लोकेश राहुलचा एक्स्ट्रा कव्हरवरून षटकार अन् विंडीज दिग्गजाचं बेस्ट ट्विट!
Video : सचिन तेंडुलकरचं 'चॅलेंज' विनोद कांबळीनं केलं पूर्ण
पाकिस्तानमध्ये येऊन खेळा, शाहिद आफ्रिदीचं टीम इंडियाला चॅलेंज!
विराट कोहली अन् इम्रान खान यांच्यात साम्य; संजय मांजरेकरचं विधान
प्रयोग केला, धडपडलो अन् जिंकलो; दोन 'सुपर' विजयांमधून काय बरं शिकलो?
विराट काढतोय एका चेंडूत दोन विकेट?; लोकेशला यष्टीमागे उभं करण्यामागे 'सिक्रेट गेम'
Web Title: India vs New Zealand : INDIA FINED FOR SLOW OVER-RATE IN FINAL T20I AGAINST NEW ZEALAND
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.