India vs New Zealand : भारतीय ट्वेंटी-20 संघात मिताली राजला स्थान नाही, निवृत्तीचा मुहूर्त ठरला

India vs New Zealand: भारताची अनुभवी खेळाडू मिताली राजला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात अंतिम संघात स्थान मिळाले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 10:14 AM2019-02-06T10:14:16+5:302019-02-06T10:14:36+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand: Mithali Raj has no place in Indian Twenty20 squad | India vs New Zealand : भारतीय ट्वेंटी-20 संघात मिताली राजला स्थान नाही, निवृत्तीचा मुहूर्त ठरला

India vs New Zealand : भारतीय ट्वेंटी-20 संघात मिताली राजला स्थान नाही, निवृत्तीचा मुहूर्त ठरला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट : भारताची अनुभवी खेळाडू मिताली राजला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात अंतिम संघात स्थान मिळाले नाही. मितालीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये वन डे मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला, परंतु हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली तिला ट्वेंटी-20 संघात स्थान मिळाले नाही. प्रिया पूनियाने आजच्या सामन्यात भारतीय संघाकडून पदार्पण केले. 

मितालीने पहिल्या सामन्यापूर्वीच ट्वेंटी-20तून निवृत्तीचे संकेत दिले होते. पण, तिच्या निवृत्तीचा मुहूर्त ठरला नव्हता. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत मिताली निवृत्ती स्वीकारेल, अशी माहिती बीसीसीआयने दिली. मार्च महिन्यात इंग्लंडचा महिला संघ ट्वेंटी-20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की,''ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी कर्णधार हरमनप्रीत कौरला संघबांधणी करायची आहे आणि मिताली ही बाब जाणते. त्यामुळे ट्वेंटी-20 स्पर्धेत मितालीचे खेळणे जवळपास अनिश्चित आहे.'' 



अधिकारी पुढे म्हणाला की,''मितालीसारख्या दिग्गज खेळाडूचा निरोप समारंभ तिच्या प्रतिभेला शोभणारा हवा. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ती ट्वेंटी-20 मधून निवृत्ती घेऊ शकते.''  मितालीने 85 ट्वेंटी-20 सामन्यांत 2283 धावा केल्या आहेत आणि त्यात 17 अर्धशतकांचा समावेश आहे. तिची सर्वोत्तम खेळी ही 97 धावांची आहे.  

Web Title: India vs New Zealand: Mithali Raj has no place in Indian Twenty20 squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.