माऊंट मोनगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघ सध्या भन्नाट फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलियानंतर आता त्यांनी न्यूझीलंडमध्येही एकदिवसीय मालिका जिंकली आहे. भारतीय संघात बऱ्याच रंजक गोष्टी घडत असतात. काही खेळाडूंना टोपण नावंही ठेवण्यात आलेली आहे. पण या संघातील लालाजी नेमका कोण आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का...
भारतीय संघात सलामीवीर शिखर धवनचे गब्बर हे टोपण नाव आहे. रोहित शर्माला हिटमॅन, महेंद्रसिंग धोनीला माही, विराट कोहलीला चिकू या टोपण नावांनी ओळखले जाते. पण या साऱ्यापेक्षा लालाजी हे नाव वेगळे आहे.
न्यूझीलंडमधील तिन्ही सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी चांगली गोलंदाजी करत आहे. त्याला सामनावीराचे पुरस्कारही मिळाले आहे. सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यावर शमीची चहल टीव्हीवर एक मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये संघातील लालाजी कोण, याची उकल झाली आहे.
शमीने चहल टीव्हीवर झालेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, " चहल टीव्ही तुम्ही पाहतच आहात. या टीव्हीवर मनोरंजन गोष्टी आणि चांगल्या मुलाखती पाहायला मिळतात. या चॅनेलला तुम्ही असेच प्रमोट करत राहा. "
या मुलाखतीनंतर युजवेंद्र चहलने शमीचे आभार मानले. पण आभार मानताना चहलने शमीचे टोपण नाव घेतले आणि ते होते लालाजी...
सलग तिसऱ्या वन डे सामन्यात भारताने न्यूझीलंडला नमवले. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात तीन विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना इंग्रजीत बोलावे लागते आणि शमीचं इंग्रजी कसं आहे, हे सांगायला नको. मात्र, सोमवारी त्याने फाडफाड इंग्रजी बोलून अँकरसह कर्णधार विराट कोहलीला आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर अँकरने जी प्रतिक्रिया दिली, ती ऐकून कोहलीला हसू आवरले नाही.
पुरस्कार वितरण सोहळ्यात अँकर सायमन डौलने शमीला इंग्रजीत प्रश्न विचारला. शमीच्या हिंदीचे भाषांतर करून सांगण्यासाठी कर्णधार कोहलीही उपस्थित होता. मात्र, शमीनं त्याला संधी दिलीच नाही. डौलच्या प्रश्नाचं शमीनं इंग्रजीतच उत्तर दिले. शमीचं फाडफाड इंग्रजी ऐकून अँकर चकीत झाला आणि तोच चक्क हिंदी बोलू लागला. तो म्हणाला, तुझे इंग्रजी फार चांगले आहे. 2008-09 साली भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडमध्ये 3-1 च्या फरकाने वन-डे मालिका जिंकली होती.