मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात टीम इंडियाने पहिल्या दहा षटकांत वर्चस्व गाजवले. जसप्रीत बुमराहनं दुसऱ्याच षटकात किवींना धक्का दिला. त्यानं मार्टिन गुप्तीलला दुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या कर्णधार विराट कोहलीकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. या विकेटसह बुमराहनं 36 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली.
बुमराह व भुवनेश्वर कुमार यांच्या टिच्चून माऱ्यासमोर न्यूझीलंडला पहिल्या दहा षटकांत 1 बाद 27 धावा करता आल्या. भुवीनं पाच षटकांत 1 निर्धाव षटक टाकून 13 धावा दिल्या, तर बुमराहने 4 षटकांत 10 धावांत 1 विकेट घेतली. त्यात एक निर्धाव षटकही आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या पॉवर प्लेमधील ही निचांक धावसंख्या ठरली. भारताने याच स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध पहिल्या दहा षटकातं 1 बाद 28 धावा केल्या होत्या.
बुमराहने विकेट घेत एका वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक 18 विकेट घेण्याच्या झहीरच्या विक्रमाशी बरोबरी केली. झहीरने 2003च्या वर्ल्ड कप स्पर्धेत 18 विकेट घेतल्या होत्या. उमेश यादव ( 2015) आणि रॉजर बिन्नी ( 1983) यांनीही एका वर्ल्ड कप स्पर्धेत 18 विकेट घेतल्या आहेत. एकाच वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक 21 विकेट घेण्याचा भारतीय गोलंदाजाचा विक्रम झहीरच्या नावावर आहे आणि बुमराहला तो विक्रम खुणावत आहे.