मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेली उपांत्य लढत गाजवली ती रवींद्र जडेजाने. स्पर्धेतील सुरुवातीच्या लढतींमध्ये संघाबाहेर असलेल्या रवींद्र जडेजाने गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी अशी तिन्ही क्षेत्रात अष्टपैलू कामगिरी करताना उपांत्य लढतीत रंगत आणली. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चमक दाखवल्यानंतर आज जडेजाने धमाकेदार फलंदाजी करत सामन्याचे चित्र पालटवले. मात्र जडेजा 77 धावा काढून बाद झाला आणि सामना भारताच्या हातून निसटला. रवींद्र जडेजाने मंगळवारी किफायतशीर गोलंदाजी करत एक विकेट टिपला होता. त्यानंतर आजही मैदानावर जडेजाचा जलवा कायम राहिला. बुधवारचा खेळ सुरू झाला तेव्हा किवी मोठी धावसंख्या उभारतील असे वाटले होते, परंतु रवींद्र जडेजानं त्यांना रोखले. रॉस टेलरला धावबाद केल्यानंतर जडेजानं किवींना आणखी एक धक्का दिला, भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर त्यानं टॉम लॅथमचा सुरेख झेल टिपला. त्यामुळे किवींना फार काही करता आले नाही. भुवीनं 10 षटकांत 43 धावा देत तीन विकेट घेतल्या.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India Vs New Zealand World Cup Semi Final : सर जडेजाची अष्टपैलू झुंज अपयशी
India Vs New Zealand World Cup Semi Final : सर जडेजाची अष्टपैलू झुंज अपयशी
भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेली उपांत्य लढत गाजवली ती रवींद्र जडेजाने. पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 7:30 PM