ठळक मुद्देनो बॉलवर खेळाडू झेलबाद होऊ शकत नाही
दुबई, आशिया चषक 2018 : एखाद्या खेळाडूचा झेल पकडला तर तो बाद होते आणि मैदान सोडतो. फक्त नो बॉलवर खेळाडू झेलबाद होऊ शकत नाही. पण नो बॉल नसूनही आमीरचा झेल टिपला आणि तरीही त्याला बाद ठरवले.
नेमके घडले असे की, युजवेंद चहलच्या 36व्या चेंडूतीव दुसरा चेंडू नो बॉल होता. त्यावर फहिम अश्रफने एक धाव घेतली. त्यानंतरच्या चेंडूवर मोहम्मद आमीरने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा झेल उडाला. हा झेल पकडलाही, पण फ्री-हिट असल्यामुळे आमीरला नाबाद ठरवण्यात आले.