- सुनील गावस्कर लिहितात...
टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी रवाना झाली त्यावेळी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात विजयासह मायदेशी परतणारा हा पहिला भारतीय संघ ठरेल, अशी आशा होती, पण असे घडले नाही. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात तीन डावांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरही चौथ्या डावात निराशाजनक कामगिरी झाल्यामुळे भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. तिस-या कसोटी सामन्यात खडतर खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर पाहुण्या संघाने विजय मिळवला. त्यामुळे कसोटी मालिकेपूर्वी सराव सामन्यांचे महत्त्व कळले.
भारतीय संघाची इंग्लंड दौºयाची सुरुवात एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेने होत आहे. त्यामुळे भारतीय संघाला कसोटी सामना खेळण्यापूर्वी एक महिन्याचा कालावधी मिळणार आहे. एकदिवसीय व टी-२० या आक्रमक क्रिकेटच्या काळातही कसोटी मालिकेच्या निकालाला महत्त्व आहे. अशा स्थितीत महिनाभर इंग्लंडमधील वातावरणासोबत जुळवून घेण्याची संधी मिळणार आहे. आॅस्ट्रेलियातही कसोटी मालिकेपूर्वी किमान दोन सराव सामन्यांची योजना आखायला हवी. नाहीतर दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरुवातीला जे घडले, त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता राहील. विराट कोहलीसारखे स्टार खेळाडू सामन्याच्या एका दिवसापूर्वी दाखल झाल्यानंतरही शतकी खेळी करू शकतात, पण सामान्य क्रिकेटपटूंना परिस्थितीसोबत जुळवून घेण्यासाठी मात्र काही वेळ मिळणे आवश्यक असते.
तिसºया कसोटी सामन्यातील विजयानंतर भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहज विजय मिळवता आला. डर्बन एकदिवसीय सामन्याचा अपवाद वगळता उर्वरित सर्व सामन्यांमध्ये यजमान संघाच्या आघाडीच्या तीन फलंदाजांनी ३० पेक्षा अधिक षटके फलंदाजी केली. त्यात प्रत्येकाने आळीपाळीने शतक ठोकले. या विजयात महत्त्वाची बाब म्हणजे मनगटाच्या जोरावर चेंडू वळविणाºया फिरकीपटूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली. या दोघांनी दक्षिण आफ्रिकन फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. पाच लढतींच्या अनुभवानंतरही या फलंदाजांना फिरकीपटूंच्या चेंडूंचा योग्य अंदाज घेणे शक्य झालेले नाही. कुलदीप यादवने कसोटी क्रिकेटमध्येही आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. जसप्रीत बुमराहनेही पांढºया चेंडूपासून लाल चेंडूपर्यंतचा प्रवास पूर्ण केलेला आहे. अशा स्थितीत चहलही कसोटी क्रिकेटमध्ये फिरकीच्या जोरावर प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवू शकतो. मनगटाच्या जोरावर चेंडू वळविणारे फिरकीपटू खेळपट्टीकडून मिळवणाºया मदतीवर अवलंबून नसल्याने ते अधिक प्रभावी ठरतात. ते चेंडूला उंची देत फलंदाजांना बुचकळ्यात टाकतात. भारतीय संघाच्या चमकदार कामगिरीचा आनंद उपभोगण्याची संधी मिळाली आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यामध्ये हा संघ विजयाच्या निर्धाराने उतरेल, असा विश्वास आहे. चौथ्या एकदिवसीय सामन्यामध्ये पावसाचा व्यत्यय निर्माण झाला नसता तर भारतीय संघाने मालिकेत ६-० ने क्लीन स्वीप दिला असता. (पीएमजी)
Web Title: India vs South Africa: Indian spinners shine
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.