Breaking News : भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, फॅफ ड्यू प्लेसिसचे पुनरागमन

India vs South Africa : मार्च महिन्यात होणाऱ्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 12:57 PM2020-03-02T12:57:44+5:302020-03-02T13:00:38+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa, ODI series : Faf du Plessis, Rassie van der Dussen return to South Africa ODI squad for India series svg | Breaking News : भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, फॅफ ड्यू प्लेसिसचे पुनरागमन

Breaking News : भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, फॅफ ड्यू प्लेसिसचे पुनरागमन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : मार्च महिन्यात होणाऱ्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेसाठी सोमवारी आफ्रिकेनं त्यांचा 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या दौऱ्या फॅफ ड्यू प्लेसिस आणि रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन संघात पुनरागमन करणार आहेत. त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. क्विंटन डी कॉकच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेचा संघ खेळणार आहे.  या मालिकेत कायले व्हेरेयने, केशव महाराज आणि लुथो सिपाम्ला यांना कायम ठेवले आहे. डावखुरा फिरकीपटू जॉर्ज लिंडे याला वन डे संघात पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. 

या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा
न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला 12 मार्चला सुरुवात होणार आहे. या मालिकेत विराट कोहलीला विश्रांती दिली जाऊ शकते. त्यात दुखापतग्रस्त रोहित शर्माही या मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या मालिकेत टीम इंडिया नव्या कर्णधाराच्या मार्गदर्शनाखाली मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. या मालिकेत हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन टीम इंडियात कमबॅक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे विराट व रोहितच्या अनुपस्थितीत शिखर धवन कर्णधाराच्या भूमिकेत दिसू शकतो. 

दक्षिण आफ्रिका संघ : क्विंटन डी कॉक ( कर्णधार), टेंबा बवुमा, रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन, फॅफ ड्यू प्लेसिस, कायले व्हेरेयने, हेनरीच क्लासेन, डेव्हिड मिलर, जॉन-जॉन स्मट्स, अँडील फेहलुक्वायो, लुंगी एनगिडी, लूथो सिपाम्ला, बेयूरन हेंड्रीक्स, अॅनरीच नॉर्टजे, जॉर्ज लिंडे, केशव महाराज

वन डे 
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 12 मार्च, धर्मशाला
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 15 मार्च, लखनौ
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 18 मार्च, कोलकाता
 

 

Web Title: India vs South Africa, ODI series : Faf du Plessis, Rassie van der Dussen return to South Africa ODI squad for India series svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.