India Vs South Africa Weather Report : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वन डे मालिकेला सुरूवात होत आहे. लोकेश राहुलच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात असणार आहे. मात्र, आजच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. याआधी दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळली गेली, जी १-१ अशी बरोबरीत संपली. ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात पावसाने खेळ खराब केला नाही. पण आता पावसामुळे वन डे मालिकेतील काम बिघडू शकते. या मालिकेतील पहिला सामना जोहान्सबर्ग येथे होणार आहे. जोहान्सबर्गमधील हवामान पावसाला आमंत्रण देणारे असल्याने चाहत्यांना चिंता सतावत आहे.
जोहान्सबर्ग येथे सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण होते. पण पावसाची शक्यता फार कमी असल्याचे कळते. Accuweather च्या अहवालानुसार, सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता फार कमी आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, मात्र त्याचा सामन्यावर काही परिणाम होईल असे दिसत नाही. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामना सुरू होईल. जोहान्सबर्गमध्ये सामन्याच्या दिवशी कमाल तापमान २८ अंश असेल तर किमान तापमान १६ अंश असेल.
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघ -लोकेश राहुल (कर्णधार), युझवेंद्र चहल, रिंकू सिंग, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजित पाटीदार, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर.
वन डे मालिकेचे वेळापत्रक - १७ डिसेंबर - जोहान्सबर्ग, दुपारी १.३० वाजल्यापासून१९ डिसेंबर - जीकबेर्हा, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून २१ डिसेंबर - पर्ल, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून