Join us  

India vs Sri Lanka, 3rd T20I : विराट कोहलीचा World Record; पहिली धाव अन् कर्णधारांमध्ये पटकावलं मानाचं स्थान

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात विराट कोहलीनं पहिली धाव घेताच विश्वविक्रमाला मिठी मारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 8:15 PM

Open in App

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात विराट कोहलीनं पहिली धाव घेताच विश्वविक्रमाला मिठी मारली. या सामन्यात कोहली सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यानं ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.

India vs Sri Lanka, 3rd T20I : अखेर 1637 दिवसांनी 'हा' खेळाडू टीम इंडियाकडून खेळणार 

India vs Sri Lanka, 3rd T20I : अंतिम सामन्यात टीम इंडियानं संघात केले तीन महत्त्वपूर्ण बदल 

India vs Sri Lanka, 3rd T20I : पुण्याचा इतिहास जाणून श्रीलंकेनं संधी साधली अन्...

पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  टीम इंडियानं या महत्त्वाच्या सामन्यात संजू सॅमसन, युजवेंद्र चहल आणि मनीष पांडे यांना संधी दिली आहे. आजच्या सामन्यात कुलदीप यादव, रिषभ पंत आणि शिवम दुबे यांना विश्रांती दिली. पहिला पॉवर प्ले टीम इंडियाच्या बाजूनं राहिला. दुसऱ्याच षटकात मिळालेल्या जीवदानानंतर शिखर धवननं सावध खेळ केला. पण, दुसऱ्या बाजूनं लोकेश राहुलनं फटकेबाजी केली. खेळपट्टीवर स्थिरस्थावर झाल्यानंतर धवनही रंगात आला. त्यानेही श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या दोघांनी पहिल्या पॉवरप्लेमध्ये टीम इंडियासाठी 63 धावा जोडल्या. 

धवनने 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण, लक्षण संदाकनच्या गोलंदाजीवर धवन बाद झाला. धवनने 36 चेंडूंत 52 धावा केल्या. गब्बर माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं संजू सॅमसनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले आणि त्यानं पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला. सॅमसनचा हा फटका पाहून डगआउटमध्ये बसलेला कोहलीही उभा राहून टाळ्या वाजवू लागला. पण, दुसऱ्याच चेंडूवर संजू पायचीत होऊन माघारी परतला. वनिंदू हसरंगानं त्याला बाद केले. 

लोकेश राहुल खेळपट्टीवर जम बसवून होता. त्यानंही 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्यानं संदाकनच्या पुढच्या चेंडूवर खणखणीत चौकार मारला, पण लगेच पुढील चेंडूवर तो यष्टिचीत झाला. श्रेयस अय्यरनं पहिल्या चेंडूवर चौकार मारला, परंतु दुसऱ्या चेंडूवर गोलंदाजाच्याच हातात झेल देऊन तंबूत परतला. त्यानंतर विराट कोहली मैदानावर आला. त्यानं पहिली धाव घेताच वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याची ही 11000 धाव ठरली. त्यानं सर्वात कमी डावांत हा पराक्रम करताना ऑस्ट्रेलियाचा पाँटिगला विक्रम मोडला. विराटनं 196 डावांमध्ये हा पल्ला गाठला, तर पाँटिंगला 253 डाव खेळावे लागले होते. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाविराट कोहली