India vs Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या अडचणी मालिका संपल्यानंतरही वाढत चालल्या आहेत. दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कात टीम इंडियाचे ८ खेळाडू आले होते आणि त्यांना विलगिकरणात रहावे लागले होते. त्यापैकी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कृष्णप्पा गौथम आणि युजवेंद्र चहल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्यांना आणखी ७ दिवस विलगिकरणात रहावे लागेल. कृणालसह विलगिकरणात असलेले ९ खेळाडू टीम इंडियासोबत भारतात परतणार नाहीत. त्यांच्याशिवाय अन्य भारतीय खेळाडू आज मायदेशात परततील, पण ही ९ खेळाडू सर्व फॉरमॅलिटी पूर्ण केल्यानंतरच मायदेशात परततील.
दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्याआधी केलेल्या कोरोना चाचणीत अष्टपैलू खेळाडू कृणालला कोरोना झाल्याचे समोर आले. बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमनं त्यानंतर कृणालच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंना विलगिकरणात जाण्यास सांगितले. त्यामुळे त्यांना दुसऱ्या व तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत खेळता आले नाही. पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, गौथम, चहल, दीपक चहर, हार्दिक पांड्या, मनिष पांडे आणि इशान किशन हे कृणालच्या संपर्कात आले होते. आज झालेल्या चाचणीत चहल व गौथम यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या दोघांव्यतिरिक्त इतरांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून ते लवकरच मायदेशासाठी रवाना होतील.
कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेले ८ खेळाडू विलगिकरणात आहेत. अशात दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी चार नव्या खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात चेतन सकारिया, नितिश राणा, ऋतुराज गायकवाड आणि देवदत्त पडिक्कल यांनी पदार्पण केले. शिवाय नेट बॉलर्स इशान पोरेल, संदीप वॉरियर्स, अर्षदीप सिंग, साई किशोर आणि सिमरजीत सिंग यांची मुख्य संघात निवड करण्यात