मुंबई : भारताविरुद्धच्या तिसऱ्या लढतीत वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचा सलामीवीर इव्हिन लुईसला जबर दुखापत झाली असून त्याला थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.
क्षेत्ररक्षण करत असताना लुईसच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली. ही दुखापत एवढी गंभीर होती की, त्याला मैदानाबाहेर नेण्यासाठी थेट स्ट्रेचर आणावे लागले. त्यानंतर लुईसला उपचारांसाठी थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या डावाची सुरुवात लुईसला करता आली नाही. त्याच्या जागी ब्रेंडन किंगला सलामीला पाठवण्यात आले, पण किंग फक्त पाच धावा करून माघारी परतला.
रोहित-राहुलने धू धू धुतले; वेस्ट इंडिजपुढे 241 धावांचे आव्हान ठेवलेरोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोन्ही सलामीवीरांनी वानखेडेवरच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांच्या दणदणीत खेळींच्या जोरावर भारताला वेस्ट इंडिजपुढे 241 धावांचे आव्हान ठेवता आले.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या सामन्यात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी भारताला दणकेबाज सुरुवात करून दिली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पाचव्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले.
रोहितने यावेळी षटकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतरही रोहित आक्रमक फटकेबाी करत होता. दुसरीकडे राहुलही गोलंदाजीवर तुटून पडत होता. रोहितनंतर राहुलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर एक मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित बाद झाला. रोहितने ३४ चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ७१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
रोहित बाद झाल्यावर रिषभ पंत फलंदाजीसाठी आला. पण पंतला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. पंतनंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार विराट कोहलीनेही आक्रमक पवित्रा सुरुवातीपासून ठेवला. या दोघांनीही वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीवर प्रहार करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
रोहित शर्माने रचला इतिहास, बनला भारताचा पहिला क्रिकेटपटूवेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने इतिहास रचला आहे. रोहितने केलेला पराक्रम आतापर्यंत भारताच्या एकाही फलंदाजाला करता आलेला नाही.रोहितने या सामन्यात आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. रोहितने या सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याचबरोबर रोहितने या सामन्यात एक इतिहास रचला आहे. रोहितने या सामन्यात आपला ४००वा षटकार लगावला. आतापर्यंत एकाही भारताच्या खेळाडूला ४०० षटकार लगावता आलेले नाहीत.
रोहित हा भारताकडून ४०० षटकार पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू आहे. सर्वाधिक षटकार वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहेत. त्याने आतापर्यंत ५३४ षटकार लगावले आहे. या यादीमध्ये दुसरा क्रमांक पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचा आहे. त्याच्या नावावर ४७६ षटकार आहेत.