मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तिसरा ट्वेन्टी-२० सामना वानखेडेवर सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल वेस्ट इंडिजच्या बाजूने लागला आहे. त्यांना नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे. नाणेफेकीनंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यासाठी आपला संघ जाहील केला. यावेळी कोणाला संघात स्थान मिळाले आणि कोणाला डच्चू, ते जाणून घ्या...
या सामन्यात वेस्ट इंडिजने संघात एकही बदल केलेला नाही. गेल्या सामन्यात त्यांना विजय मिळवला होता. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या संघात एकही बदल केलेला नाही.
वेस्ट इंडिजने संघात एकही बदल केलेला नसला तरी भारताने मात्र या सामन्यासाठी संघात दोन महत्वाचे बदल केले आहेत. या सामन्यासाठी भारतीय संघातून रवींद्र जडेजाला डच्चू देण्यात आला आहे. त्याच्या जागी संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर फिरकीपटू युजवेंद्र चहलला संघातून काढण्यात आले असून कुलदीप यादवला संघात स्थान देण्यात आलेले आहे.
आपल्या घरच्याच मैदानात हे दोन दिग्गज खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकणारआपल्या घरच्याच मैदानात दोन दिग्गज खेळाडू आज वानखेडेवर होणाऱ्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. कारण हा सामना जो संघ जिंकेल, त्यांना मालिका विजय मिळवता येणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. पण दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर बाजी मारली आणि मालिका १-१ अशी बरोबरी आली. त्यामुळे हा तिसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा ठरणार आहे.
हे आयपीएलमधील मुंबई इंडियन्स या संघाचे घरचे मैदान आहे. मुंबई इंडियन्सच्या संघातील दोन दिग्गज खेळाडू यावेळी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. हे दोन दिग्गज खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि महत्वाचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड.
वानखेडेवर वेस्ट इंडिजला धक्का द्यायला मुंबईचे त्रिकुट सज्जभारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा निर्णायक सामना वानखेडे मैदानावर होणार आहे. वानखेडेवर वेस्ट इंडिजला धक्का देण्यासाठी मुंबईचे त्रिकुट सज्ज असल्याचेच पाहायला मिळाले.
घरच्या मैदानात खेळाडूंची कामगिरी चागंली होते, असे म्हटले जाते. कारण त्यांना चाहत्यांचा चांगला पाठिंबा मिळत असतो. या सामन्यात वानखेडेवर भारताकडून तीन खेळाडू उतरतील, असे म्हटले जात आहे.
भारताचा सलामीवीर रोहित शर्माला अजूनही या मालिकेत सूर गवसलेला दिसत नाही. कारण या मालिकेत रोहितला एकही मोठी खेळी साकारता आलेली नाही. त्यामुळे घरच्या मैदानात रोहित कशी कामगिरी करतो, यावर सर्वांचे लक्ष असेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मुंबईकर शिवम दुबेने धडाकेबाज अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे आता घरच्या मैदानात तो पुन्हा एकदा तळपणार का, याची उत्सुकता मुंबईकरांना असेल. रोहित आणि शिवम यांच्याबरोबर श्रेयस अय्यरही या सामन्यात खेळण्याची शक्यता आले. त्यामुळे वेस्ट इंडिजला धक्का देण्यासाठी मुंबईचे त्रिकुट सज्ज असल्याचे म्हटले जात आहे.
वानखेडेवर सर्व ट्वेन्टी-२० सामने वेस्ट इंडिजनेच जिंकले; मालिकेचा निकाल काय लागणारभारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा निर्णायक सामना वानखेडे मैदानावर होणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल त्यांना ट्वेन्टी-२० मालिका जिंकता येणार आहे. या महत्वाच्या सामन्यापूर्वी एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे वेस्ट इंडिजने वानखेडेवर एकही ट्वेन्टी-२० सामना गमावलेला नाही. दुसराकडे या मैदानात भारताची कामगिरी आतापर्यंत चांगली झालेली नाही.
वेस्ट इंडिजने आतापर्यंत वानखेडेवर दोन ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. वेस्ट इंडिजने पहिला ट्वेन्टी-२० सामना २०१६ साली झालेल्या विश्वचषकात इंग्लंडबरोबर पहिला सामना येथे खेळला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजने सहा विकेट्स राखून विजय मिळवला होता.
वानखेडेवर वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी रंगली होती. या सामन्यात वेस्ट इंडिजने सात विकेट्स राखून विजय मिळवला होता. या विजयासह वेस्ट इंडिजने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान पटकावले होते.
भारतीय संघाने वानखेडेवर तीन ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये भारताला फक्त एकच विजय मिळवता आला आहे. भारताला वानखेडेवरील पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात इंग्लंडने पराभूत केले होते. त्यानंतर दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताला वेस्ट इंडिजने ट्वेन्टी-२० विश्वचषकात पराभूत केले होते. पण २४ डिसेंबर २०१७ साली झालेल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने श्रीलंकेवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्यामुळे वानखेडेवरची आकडेवारी पाहिली तर भारतापेक्षा वेस्ट इंडिजचेच पारडे जड दिसत आहे.