बाऊन्सर लागल्याने भारतीय क्रिकेटर जखमी

पाकिस्तानच्या एका उदयोन्मुख खेळाडूचा बाऊन्सर लागून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच एक भारतीय क्रिकेटर बाऊन्सरमुळे जखमी झाला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 07:19 PM2017-08-17T19:19:46+5:302017-08-17T19:21:07+5:30

whatsapp join usJoin us
Indian cricketer injured after bouncer hits him on shoulder | बाऊन्सर लागल्याने भारतीय क्रिकेटर जखमी

बाऊन्सर लागल्याने भारतीय क्रिकेटर जखमी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली, दि. 17 - पाकिस्तानच्या एका उदयोन्मुख खेळाडूचा बाऊन्सर लागून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच एक भारतीय क्रिकेटर बाऊन्सरमुळे जखमी झाला आहे. भारत 'ए' संघाचा ऑलराउंडर विजय शंकर बाऊन्सर लागल्याने जखमी झाला आहे. भारत 'ए' आणि दक्षिण आफ्रिका 'ए' संघात सामना सुरु असताना बाऊन्सर बॉल विजयच्या खांद्याला लागला, आणि तो गंभीर जखमी झाला. 

आणखी वाचा
डोक्यावर बाऊन्सर आदळल्याने पाकिस्तानच्या उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू  
हेजलवूडचा खतरनाक बाऊन्सर, थोडक्यात वाचला डेव्हिड वॉर्नर

भारतीय क्रिकेट संघाचे पहिली इनिंग खेळत होता. यावेळी मैदानावर फलंदाजी करत असलेल्या विजयच्या खांद्याला बाऊन्सर बॉल लागल्याने तो गंभीर जखमी झाला. बॉलचा मारा इतका जबरदस्त होता की, विजयला मैदान सोडावं लागलं. 

तत्पूर्वी 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या एका उदयोन्मुख खेळाडूचा डोक्यावर बाऊन्सर आदळल्याने मृत्यू झाला होता. झुबेर अहमद असे या खेळाडूचे नाव आहे. पाकिस्तानच्या फखर जमान अकादमीचा तो सदस्य होता. १४ ऑगस्ट म्हणजेच पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी एका क्लब मॅचदरम्यान ही घटना घडली. गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूच्या उसळीबाबत योग्य अंदाज न आल्याने तो चेंडू थेट त्याच्या डोक्यावर जाऊन आदळला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. फलंदाजी करताना झुबेरने हेल्मेट घातले नव्हते अशी माहिती समोर आली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोडार्ने ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. झुबेर अहमदचा मृत्यू दु:खद आहे. खेळताना नेहमी हेल्मेट वापरावं आणि सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यायला हवी हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय, असं पीसीबीने ट्विट करून म्हटलं होतं.

क्रिकेटच्या मैदानावर अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2014 साली देशांतर्गत सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्यूज याचा फलंदाजीदरम्यान डोक्यावर चेंडू आदळल्याने मृत्यू झाला होता. या अपघातानंतर संपूर्ण क्रिकेटविश्व दु:खाच्या सागरात बुडालं होतं.  वेगवान गोलंदाज सीन ऍबॉट याचा उसळता चेंडू हूक करण्याच्या नादात डोक्‍याच्या मागील भागावर आदळला होता. या घटनेनंतर त्याला तातडीच्या प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सिडनी हॉस्पिटलमध्ये त्याच्या डोक्‍यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यानंतरही तो कोमामध्येच होता, अखेर त्याचा मृत्यू झाला. 

याशिवाय काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर थोडक्यात बचावला होता. जोश हेजलवूडच्या एका खतरनाक बाऊन्सरवर तो जखमी झाला. सराव सामन्यादरम्यान ही घटना घडली होती. हेजलवूडच्या बाऊन्सरवर वॉर्नरने जोरदार फटका लगावण्याचा प्रयत्न केला; पण चेंडूच्या उसळीचा त्याचा अंदाज चुकला. त्यामुळे चेंडू थेट त्याच्या मानेवर जाऊन आदळला आणि वॉर्नर खाली कोसळला.

यापूर्वीच्या दुर्दैवी घटना 
-1998 मध्ये भारताचा क्रिकेटपटू रमण लांबा शॉर्टलेगवर क्षेत्ररक्षण करताना चेंडू कानावर लागल्याने जखमी. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू 
-1958-59 मध्ये पाकिस्तानचा यष्टिरक्षक अब्दुल अझीज याला स्थानिक स्पर्धेत चेंडू छातीवर लागला. जागीच बेशुद्ध पडलेला अझीजचा रुग्णालयात जात असतानाच मृत्यू 
-1961-62 मध्ये भारताच्या नरी कॉण्ट्रॅक्‍टर यांना विंडीजच्या ग्रिपिथचा चेंडू डोक्‍याला लागला होता. तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सुदैवाने कॉण्ट्रॅक्‍टर यांचा जीव वाचला, पण पुन्हा क्रिकेट खेळू शकले नाहीत. 
-2012 मध्ये सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक मार्क बाऊचर याच्या डोळ्याला इजा. त्यानंतर त्याची क्रिकेटमधून निवृत्ती. 
-2012 मध्ये झुल्फिकार भट्टी या पाकिस्तानी क्रिकेटपटूचा स्थानिक सामन्यात जिना स्टेडियमवर उसळता चेंडू छातीत लागला आणि त्याचा पिचवर मृत्यू झाला. 
-2013 मध्ये डेर्रीन रंडल दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाचा उसळणारा चेंडू डोक्‍यावर लागून मृत्यू झाला. 
 

Web Title: Indian cricketer injured after bouncer hits him on shoulder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.