मुंबई : इंग्लंडमधील विश्वचषकात भारताचा उपांत्य फेरीत पराभव झाला. या पराभवाने भारतीय चाहते निराश झाले आहेत. पण भारताच्या चाहत्यंना आता निराश होण्याची गरज नाही. कारण आगामी विश्वचषक भारताचाच असेल, असे म्हटले जात आहे. यामागे काही समीकरणं असल्याचेही म्हटले जात आहे.
पहिले तीन विश्वचषक अनुक्रमे १९७५, १९७९ आणि १९८३ साली इंग्लंडमध्ये खेळवण्यात आले होते. भारताने १९८३ साली विश्वचषक जिंकला आणि त्यांना पहिल्यांदा यजमानपद देण्यात आले. त्यामुळेच १९८७ साली भारताने विश्वचषकाचे आयोजन केले होते. त्यानंतर १९९२ साली ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषकाचे आयोजन केले होते. कारण १९८७ साली ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला होता. १९९२ साली पाकिस्तानने विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर १९९६ साली भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याकडे विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होतो. १९९६ साली झालेला विश्वचषक श्रीलंकेने जिंकला होता. पण त्यानंतर १९९९, २००३ आणि २००७ हे तिन्ही विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. पण २०११चा विश्वचषक भारताने जिंकला होता. त्यानंतर २०१५ साली झालेला विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. आणि आता इंग्लंडने २०१९ साली झालेल्या विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते.
भारतीय संघ २०११ साली झालेल्या विश्वचषकाचा सहयजमान होता. २०११चा विश्वचषक भारतानेच जिंकला होता. २०१५ साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये विश्वचषक खेळवला गेला होता. हा विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. २०१९ साली झालेला विश्वचषक हा इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवला गेला. हा विश्वचषक इंग्लंडने जिंकला. आता आगामी विश्वचषक भारतामध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे २०२३ झालेला विश्वचषक भारतीय संघ जिंकेल, असे काही जणांना वाटत आहे.
भारताला न्यूझीलंडने उपांत्य फेरीत पराभूत केले होते, पण तरीही अंतिम फेरीत भारताने न्यूझीलंडला पाठिंबा दिला होता. पण असे असले तरी भारतीय संघ विश्वचषक कधी जिंकणार, हा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे. त्यामुळेच आता त्यांची चिंता मिटणार असल्याचे म्हटले जात असून आगामी विश्वचषक भारताचा असल्याचे म्हटले जात आहे.