ठळक मुद्देभारतात पहिल्यांदाच बनवली बाईक :बाईकवर मिळते तीन वर्षांची वॉरेंटी :सहा गिअर्समुळे पळवायचा येते मजा
मुंबई : भारताचा माजी विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा बाईकवेडा आहे, हे सर्वांना माहितीच आहे. पण माजी कर्णधार सौरव गांगुलीलाही बाईकचे वेड आहे, हे तुम्हाला माहिती नसेल. गांगुली चक्क साडे तीन लाखांची बाईक खरेदी केली आहे. गांगुलीने BMW G310 GS ही बाईक खरेदी केली असून भारतात ती पहिल्यांदाच लाँच झाली आहे.
गांगुलीने घेतलेल्या बाईकचे ही आहेत फिचर्स
बाईकवर मिळते तीन वर्षांची वॉरेंटी : बीएमडब्लू या कंपनीच्या बाईक्सवर तीन वर्षांची वॉरेंटी दिली जाते. ही वॉरेंटी 4-5 वर्षांपर्यंतही वाढवता येते.
भारतात पहिल्यांदाच बनवली बाईक : भारतात पहिल्यांदाच बीएमडब्लू या कंपनीची बाईक बनवली गेली. ही बाईक तामिळनाडू येथील होसूर येथील प्लांटमध्ये बनवली गेली. यापूर्वी जर्मनी, ब्राझील आणि थायलंडमध्ये या बाईक्स बनवल्या जात होत्या.
सहा गिअर्स : बीएमडब्ल्यू BMW G310 GS आणि BMW G310 R या बाईक्समध्ये सहा गिअर्स आहेत. त्याचबरोबर इंजिन 34 हॉर्स पॉवर एवढी एनर्जी प्रोड्यूस करते. त्याचबरोबर स्टील फ्रेम, फाइव-स्पोक एलॉय व्हील आणि एबीएस हेदेखील या बाईक्समध्ये आहे. या बाईक्स स्टाइल एचपी, कॉस्मिक ब्लॅक आणि रेसिंग रेड या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहेत.
बीएमडब्ल्यू कंपनीची बाइक घेणारा गांगुली दुसरा क्रिकेटपटू
बीएमडब्ल्यू कंपनीची बाइक घेणारा गांगुली हा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. गेल्यावर्षी भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने BMW G310 R ही बाईक खरेदी केली होती. बीएमडब्ल्यू कंपनीची बाइक खरेदी करणारा युवराज हा पहिला सेलिब्रेटी ठरला होता. या बाईकची किंमत होती 2.99 लाख रुपये. खास गोष्ट म्हणजे धोनीच्या ताफ्यात बऱ्याच बाईक्स असल्या तरी त्याच्याकडे बीएमडब्ल्यू कंपनीची एकही बाईक नाही.
बाईकवेडा धोनी
धोनीकडे पहिल्यांदा 'यामाहा आरडी350' ही बाईक होती. त्यानंतर धोनीने 'Ducati 1098' ही बाईक घेतली होती. आता धोनीकडे Kawasaki Ninja H2, Confederate X132 Hellcat, Kawasaki ZX14R Ninja, Harley Davidson Fat Boy, Yamaha Thundercat आणि Royal Enfield Machismo या बाईक्स आहेत.
Web Title: india's former captain saurav ganguly buys bmw g310-gs motorcycle
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.