नवी दिल्ली : लखनौ येथे ७ ते १0 सप्टेंबरदरम्यान होणा-या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचा ‘रन मशीन’ अंकित बावणे याची इंडिया ग्रीन संघात निवड झाली आहे. या संघाचे कर्णधारपद यष्टिरक्षक पार्थिव पटेल भूषवणार आहे. या स्पर्धेतील अन्य दोन संघ इंडिया रेड आणि इंडिया ब्ल्यू या संघांचीही घोषणा झाली असून, कर्णधारपदी अनुक्रमे अभिनव मुकुंद व सुरेश रैना यांची निवड झाली आहे.
औरंगाबादचा जिगरबाज फलंदाज अंकित बावणे याने दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध त्यांच्याच भूमीवर झालेल्या २ कसोटी सामन्यांत भारत अ संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या मलिकेत त्याने एकूण १0४ धावा केल्या होत्या व ४६ ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. तसेच या हंगामात त्याने आॅस्ट्रेलिया अ संघाविरुद्धही भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करताना २५ धावांची खेळी केली होती. इंडियन प्रीमिअर लीगमध्येही त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. अंकित बावणे याने गत रणजी हंगाम आणि आंतरराज्य टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धा चांगलीच गाजवली होती. २0१६-२0१७ चा रणजी हंगामात अंकितने ८ सामन्यांत ५७.२५ अशा प्रभावी सरासरीने २ शतके आणि ३ अर्धशतकांसह ६८७ धावा ठोकल्या होत्या. याच हंगामात त्याने आॅक्टोबर महिन्यात तुल्यबळ दिल्ली संघाविरुद्ध नाबाद २५८ धावांची विक्रमी खेळी केली होती, तसेच अंकितने नववर्षाचीदेखील दणकेबाज सुरुवात करीत बडोदा येथे सय्यद मुश्ताक करंडक टी-२0 क्रिकेट स्पर्धेत गुजरातविरुद्ध तडाखेबंद ९0 आणि सौराष्ट्र संघाविरुद्ध ७१ धावांची दणकेबाज खेळी केली, या स्पर्धेत त्याने ७८.३३ च्या जबरदस्त सरासरीने भारतातून सर्वाधिक दुसºया क्रमांकाच्या २३५ धावा फटकावल्या होत्या.
संघ (इंडिया रेड) : अभिनव मुकुंद (कर्णधार), प्रियांक पांचाल, सुदीप चॅटर्जी, इशांक जग्गी, अम्बटी रायुडू, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), बी. इंद्रजित, के. गौथम, करण शर्मा, बासील थम्पी, धवल कुलकर्णी, अशोक दिंडा, राहुल सिंग, सी.व्ही. मुकुंद
इंडिया ग्रीन : मुरली विजय, आर. समर्थ, प्रशांत चोप्रा, श्रेयस अय्यर, करुण नायर, अंकित बावणे, पार्थिव पटेल (कर्णधार), शाहबाज नदीम, परवेज रसूल, नवदीप सैनी, मोहंमद सिराज, सिद्धार्थ कौल, मयंक डागर, नितीन सैनी, अनिकेत चौधरी.
इंडिया ब्ल्यू : सुरेश रैना (कर्णधार), सुमित गोहेल, के.एस. भारत, अभिमन्यू ईश्वरन, मनोज तिवारी, दीपक हुडा, विजय शंकर, इशान किशन (यष्टिरक्षक), जयंत यादव, भार्गव भट्ट, कौशिक गांधी, इशांत शर्मा, अंकित राजपूत, सागन कामत, जयदेव उनाडकट.
स्पर्धेचे वेळापत्रक
७ ते १0 सप्टेंबर : इंडिया रेड वि. इंडिया ग्रीन (लखनौ)
१३ ते १६ सप्टेंबर : इंडिया रेड वि. इंडिया ब्ल्यू (कानपूर)
१९ ते २२ सप्टेंबर : इंडिया ब्ल्यू वि. इंडिया ग्रीन (कानपूर).
२५ ते २९ सप्टेंबर : अंतिम सामना (लखनौ).
आफ्रिका अ संघाविरुद्ध दोन कसोटी सामन्यात भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करताना मिळालेल्या अनुभवामुळे खूप काही शिकायला मिळाले आहे. भारताचे महान फलंदाज राहुल द्रविड हेही संघासोबत होते. त्यांचे मार्गदर्शन आणि या दौºयातील अनुभवामुळे आपला आत्मविश्वास दुणावला असून दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत त्याचा फायदा होईल.
-अंकित बावणे
Web Title: India's Green representation for Duleep Trophy, Aurangabad's Duleep Trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.